शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

‘अफगाण हाऊंड’ बेस्ट

By admin | Updated: November 23, 2015 00:40 IST

कॅनाईन क्लब डॉग शो : ४९८ श्वानांचा सहभाग; दर्दींची उसळली गर्दी

कोल्हापूर : कॅनाईन क्लब आॅफ कोल्हापूर यांच्यावतीने झालेल्या चॅम्पियनशिप ४० व ४१ तसेच आॅलब्रीडस चॅम्पियनशीप डॉग शोमध्ये बंगलोरचे नागराज शेट्टी यांच्या ‘अफगाण हाऊंड’ या जातीच्या श्वानाने प्रथम क्रमांकासह स्पर्धेतील ‘बेस्ट’चा बहुमान मिळविला, तर त्यांच्याच वायर फॉक्स या श्वानाने द्वितीय क्रमांक पटकावित दुहेरी यश मिळविले. बंगलोरचे आनंदकुमार यांचे ‘जर्मन शेफर्ड’ व पुण्याचे प्रसन्ना भिडे यांचे ‘ग्रेटडेन’ विभागून तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांना केनन क्लब आॅफ इंडियाच्यावतीने चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.शाहूपुरीतील शहाजी लॉ कॉलेजच्या पटांगणावर कॅनाईन क्लब आॅफ कोल्हापूरच्यावतीने शनिवार (दि. २१) पासून या डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातील श्वानप्रेमींनी आपली जातिवंत व दुर्मीळ श्वान आणली होती. यामध्ये अफगाण हाऊंड, अमेरिकन शेफर्ड, टेरियर बुल, फ्रेंच बुलडॉग, वायर फॉक्स, सैबेरियन, चिवा हुआ, आदी दुर्मीळ जातींसह डॉबरमन, गोल्डन रिट्रीयर अशा पारंपरिक जातींच्या श्वानांचा सहभाग होता. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी झाली. दहा गटांत पपीपासून ते चॅम्पियनपर्यंत ही स्पर्धा झाली. या दहा गटांमधून आठ गटांतील प्रत्येकी एक अशा आठ श्वानाच्या मालकांना चषक व केनन क्लब आॅफ इंडियाचे प्रमाणपत्र देण्यात आले. श्वानांची वयोमानानुसार शरीराची ठेवण कशी आहे, ते तंदुरुस्त कसे आहेत, त्यांचे पालनपोषण कसे केले जाते, अशा विविध चाचण्या परीक्षकांनी घेतल्या. राजेंद्र साळवी (कोल्हापूर), पॅट्राशिया (दक्षिण आफ्रिका), डी. कृष्णमूर्ती (कोईमतूर), मुनी (बडोदा) यांनी परीक्षक म्हणून काम केले.या डॉग शोसाठी दहा रुपयांचे प्रवेश शुल्क लावण्यात आले होते. तसेच श्वानांचे विविध साहित्य, त्यांना देण्यात येणारे खाद्य, त्याची काळजी घेणारी यंत्रे आदी वस्तूंच्या कंपन्यांचे स्टॉल्स स्पर्धेच्या परिसरात लावण्यात आले होते.स्पर्धेतील विविध दुर्र्मीळ व डॉबरमॅन, लॅब्रेडोर, रिट्रीयर, ग्रेटडेन अशा पारंपरिक जातींच्या श्वानांच्या करामती पाहण्यासाठी श्वानप्रेमींची रविवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत गर्दी उसळली होती. याचबरोबर श्वानांची पिल्ले पाहण्यासाठीही गर्दी होती. लहान मुलांसह तरुणांनीही मोठ्या प्रमाणात या स्पर्धा पाहण्यास गर्दी केली होती.दरवर्षी डॉग शोला देशभरातील दिल्ली, कोईमतूर, हैदराबाद, औरंगाबाद, कोकण, कर्नाटक, आदी ठिकाणांतून श्वान येतात.यावर्षी एक हजार प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी ४९८ श्वान आॅलब्रीडस चॅम्पियनशीप शोसाठी आले. त्यापैकी ४० ब्रीड्स होते, तर ४५० श्वान शारीरिक तंदुरुस्त होते.अफगाण हाऊंड, अमेरिकन स्टॅफर्ड, टेरियर बुल, फ्रेंच बुलडॉग, वायर फॉन्स, सैबेरियन, चिवा हुआ, आदी दुर्मीळ जातींसह डॉबरमन, गोल्डन रिट्रीयर असे पारंपरिक श्वान स्पर्धेत होते. वयोमानानुसार श्वानांच्या शरीराची ठेवण कशी आहे, ते कसे तंदुरुस्त आहेत, त्यांचे पालनपोषण कसे केले जाते, अशा विविध चाचण्या परीक्षकांनी घेतल्या. डॉग शोसाठी दहा रुपयांचे प्रवेश शुल्क होते. स्पर्धा पाहण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यांतूनही श्वानप्रेमींनी गर्दी केली होती. अन्य निकाल असा (४१ व्या चॅम्पियनशिप )क्रमांक श्वानमालकाचे नावब्रीडचौथा बेस्ट इन शोपवन शेट्टीअफगाण हाउंडपाचवा बेस्ट इन शोमहेश कोरीलॅब्रॅडोरसहावा बेस्ट इन शोव्ही. प्रभाकरनसैबेरियनसातवा बेस्ट इन शो प्रशांत अपराधपगआठवा बेस्ट इन शोके. ई. रमेशजर्मन शेफर्डबेस्ट पपी इन शोअजय देसाईजर्मन शेफर्डरिझर्व्ह बेस्ट इन पपी इन शोअभिमन्यू रेड्डीडॉबरमनबेस्ट इन शो ब्रीड इन इंडियानागराज शेट्टीअफगाण हाउंडरिझर्र्व्ह बेस्ट इन शोनागराज शेट्टीवायर फॉन्ससेरियटब्रीड इन इंडियाअन्य निकाल असा ( ४० व्या चॅम्पियनशिप )क्रमांक श्वानमालकाचे नाव ब्रीडचौथा बेस्ट इन शो संदेश गुरवडॉबरमनपाचवा बेस्ट इन शोरमेश केरजर्मन शेफर्डसहावा बेस्ट इन शोरवी ललिनबीगलसातवा बेस्ट इन शोव्ही. प्रभाकरनसैबेरियनआठवा बेस्ट इन शो सागर पुंगलियालॅब्रॅडोरबेस्ट पपी इन शोअभिमन्यू रेड्डीडॉबरमनरिझर्व्ह बेस्ट पपी इन शारविकुमारजर्मन शेफर्डरिझर्व्ह बेस्ट इन शोनागराज शेट्टीअफगाण हाउंडरिझर्व्ह बेस्ट इन शो नागराज शेट्टी वायरफॉक्सब्रीड इन इंडिया