बेळगाव : कर्नाटक प्रशासकीय लवादाची स्थापना बेळगावात करावी, या मागणीसाठी वकील दररोज नव्या मार्गाच्या आंदोलनाचा अवलंब करीत आहेत. काल, गुरुवारी वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार्यालयांना टाळे ठोकून तेथील कामकाज बंद पाडले होते. शुक्रवारी परिवहन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून वकिलांनी काही तास हे कार्यालय बंद पाडले. याशिवाय वकिलांनी तीन डिसेंबरला ‘बेळगाव बंद’चा आदेश दिला आहे. शहरातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे हे आंदोलन दिवसेंदिवस मजबूत होत आहे.
वकिलांची तीन डिसेंबरला बेळगाव ‘बंद’ची हाक
By admin | Updated: November 29, 2014 00:14 IST