शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : महापुरासह कोणत्याही आपतकालीन घटनेच्या सामन्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल झाल्या आहेत. जीवित हानी होऊ नये, ...

कोल्हापूर : महापुरासह कोणत्याही आपतकालीन घटनेच्या सामन्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल झाल्या आहेत. जीवित हानी होऊ नये, तातडीने आपतकालीन परिस्थिती हाताळता यावी, यासाठी ही यंत्रसामग्री महत्त्वाची ठरणार आहे. त्याची प्रात्यक्षिके सोमवारी पंचगंगा घाटावर झाली.

१५० मीटरवरील पाण्यात अडकलेल्यांसाठी लाइफलाइन लाँचर, कोसळलेल्या इमारतीमधील व्यक्तिस सुखरूप बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारा लोकेशन कॅमेरा आणि आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजीन कॅमेराचा यामध्ये समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच अद्ययावत अशी यंत्रसामग्री दाखल झाली आहे, यामुळे अग्निशमन विभाग आणखीन भक्कम झाला आहे.

१५० मीटरवरील पाण्यात अडकलेल्यांसाठी लाँचर

महापालिकेच्या अग्निशमन दलात अद्ययावत अशी मशनरी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये लाइफलाइन लाँचरचा समावेश आहे. याच्या मदतीने १०० ते १५० मीटर अंतरावरील पाण्यातील अडकलेल्या व्यक्तिजवळ दोरी जाईल व लाइफ जॅकेट त्याच्यापर्यंत पोहोचेल, अशी सुविधा असणारी यंत्रणा आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा -

महापालिकेच्या यंत्रसामग्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असलेला कॅमेराही यंदा दाखल झालेला आहे. धोकादायक इमारत कोसळली असल्यास किंवा अरुंद जागेत, बोअरवेलमध्ये एखादा व्यक्ति अडकून पडल्यास त्याचे बचावकार्य करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा अडकलेल्या व्यक्तिपर्यंत जाऊन त्याची चित्रफित, त्याच्याशी संवाद साधणे शक्य होते. संबंधित व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडकलेला आहे, याची माहिती त्वरित मिळत असल्याने जीवित हानी होण्यापासून बचाव करणे यामुळे शक्य होते.

आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजिन कॅमेरा -

आगीसारखी घटना घडल्यास धुरामध्ये अथवा आगीच्या लोटात संबंधित व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडचणीत सापडली आहे, याचा शोध घेणे, तेथील तापमान किती आहे, याची माहिती मिळण्यासाठी महत्त्वाची असणारे थर्मल इमॅजिन कॅमेराही अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाला. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने धुरामध्ये अडकलेल्या किंवा आगिमध्ये अडकलेल्या व्यक्तिचा शोध घेऊन त्याला वाचवले जावू शकते.

कोट - आधुनिक साधने खरेदीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने तत्काळ निधी उपलब्ध केला. त्यातून लाइफलाइन लाँचर, लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमॅजीन कॅमेरा महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाले.

रणजित चिले,

मुख्य अग्निशमन अधिकारी

(फोटो फायर नावाने टाकत आहे बातमीत तसेच टाका, ओळी देत नाही)