शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 11:21 IST

CoronaVirusUnlock, College, Kolhapurnews कोरोना आणि एसईबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. त्यामुळे या अभ्यासक्रमांची महाविद्यालये, सुविधा केंद्र असलेल्या महाविद्यालयांचा परिसर गर्दीने फुलला.

ठळक मुद्देअभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीरमहाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालकांची गर्दी

कोल्हापूर : कोरोना आणि एसईबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. त्यामुळे या अभ्यासक्रमांची महाविद्यालये, सुविधा केंद्र असलेल्या महाविद्यालयांचा परिसर गर्दीने फुलला.अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दि. १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. कागदपत्र पडताळणीची मुदत दि. १६ डिसेंबरपर्यंत आहे.

त्यामुळे नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, केआयटी कॉलेज, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आदी महाविद्यालयांमध्ये बुधवारी गर्दी केली.अनेक विद्यार्थी हे पालकांसमवेत आले होते. अर्जाची नोंदणी करण्यासह पुढील प्रक्रियेची माहिती विद्यार्थी बारकाईने घेत होते. भारती विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अर्ज भरण्याची सुविधातंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी (दि. ७) ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे. गुणवत्ता यादीत काही दुरुस्ती, त्रुटी असल्यास त्याबाबतची पूर्तता करून शनिवारी (दि. १२) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विकल्प अर्ज (ऑप्शन फॉर्म) भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्रवेश समितीचे समन्वयक महादेव कागवाडे यांनी दिली. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcollegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर