शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

आयुष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशच धोक्यात; पाचपट फीसाठी संस्थांची आडकाठी

By संदीप आडनाईक | Updated: October 10, 2023 19:04 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : आयुष (आयर्वेद, होमिओपॅथी युनान) अभ्यासक्रमांच्या राज्यस्तरावरील जागांसाठी दुसऱ्या कॅप राउंडसाठी प्रवेश निश्चितीचा आज, मंगळवारचा दिवस ...

संदीप आडनाईककोल्हापूर : आयुष (आयर्वेद, होमिओपॅथी युनान) अभ्यासक्रमांच्या राज्यस्तरावरील जागांसाठी दुसऱ्या कॅप राउंडसाठी प्रवेश निश्चितीचा आज, मंगळवारचा दिवस अखेरचा आहे. यात इन्स्टिट्यूट कोट्यामधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यामार्फत घेतलेल्या नीट २०२३ परीक्षेच्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. आता ''आयुष''साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या राउंडमध्ये इन्स्टिट्यूट कोट्यातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना प्रवेश घेण्यासाठी शुल्क नियंत्रण समितीने मूळ फीच्या तीन रक्कम घेऊन प्रवेश द्यावे असा शासन आदेश काढला आहे, पण कांही संस्था विद्यार्थ्यांकडून पाचपट फीची मागणी करत प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.आज, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर त्यांना प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर पडावे लागणार आहे. मग पुन्हा त्यांना नव्याने ६००० रुपये भरून नोंदणी करावी लागेल आणि पुन्हा याच प्रक्रियेतून जावे लागणार आहे. शिवाय पुढील राउंडमध्ये सीट मिळेलच याची खात्री नाही, संस्था चालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थी व पालक दुहेरी पेचात अडकले आहेत. त्यांच्यासाठी प्रवेश देण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

कर्नाटकसारखी व्यवस्था राबवायाच प्रवेश प्रक्रियेसाठी कर्नाटकमध्ये स्वतः शासन शुल्क भरून घेते आणि प्रवेश जाहीर करते. तशीच व्यवस्था महाराष्ट्रात राबवणे आवश्यक आहे, असे मत वैद्यकीय प्रवेश समुपदेशक अशोक शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.पाचपट फीसाठीच संस्थांची आडकाठीया विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या राउंडची प्रवेश प्रक्रिया आज, मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. तोपर्यंत तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही आणि शुल्क समितीच्या आथॅरिटीने तीनपट फी भरण्याची प्रवेश देण्याची सक्ती केली नाही तर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर पडावे लागणार आहे. खरंतर कॉलेजने या राउंडमध्ये प्रवेश दिला नाही तर त्या कॉलेजला दोन कोटी रुपयांचा दंड तर आहेच शिवाय प्रवेश देणे बंधनकारक असतानाही या कॉलेजची अरेरावी सुरू आहे.

पाचपट रक्कम भरून पालक प्रवेश घेणारच याची जाणीव असल्याने कॉलेजकडून आडकाठी केली जात आहे. याची शासन व शुल्क समितीने त्वरित दखल घेऊन खोटे उत्तर देणाऱ्या कॉलेज विरुद्ध कडक कारवाईसुद्धा केली पाहिजे. - अशोक शेट्टी, माजी प्राचार्य, समुपदेशक, वैद्यकीय प्रवेश

टॅग्स :kolhapurकोल्हापूर