शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन चुकत ?.. लोक ऐकत नाहीत... की विक्रेते -खरेदीदार आपलच ते खर म्हणूनच तर कोरोना घरापर्यंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:59 IST

कोल्हापूर : भाजी विके्रते, खरेदीदारांसमोर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अक्षरश: हात टेकले आहेत. भाजी खरेदीसाठी गर्दी करू नका, विके्रत्यांनी ...

ठळक मुद्देभाजी विके्रते, खरेदीदारांसमोर प्रशासनाने टेकले हातलक्ष्मीपुरी, न्यू महाद्वार रोड, निवृत्ती चौकात जत्रेचे स्वरूप : महापाालिका, पोलीस प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : भाजी विके्रते, खरेदीदारांसमोर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अक्षरश: हात टेकले आहेत. भाजी खरेदीसाठी गर्दी करू नका, विके्रत्यांनी अंतर ठेवून बसा, असे वारंवार आवाहन करूनही त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. लक्ष्मीपुरी, न्यू महाद्वार रोड, निवृत्ती चौकामध्ये जत्रेचे स्वरूप आले होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे घरात थांबणे हे आहे. मोदी सरकारने यासाठी देश लॉकडाऊन केला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही कोल्हापुरातील नागरिक भाजी खरेदीच्या कारणाने घराबाहेर पडत आहेत. तसेच भाजी विके्रते अंतर ठेवून बसत नाहीत. दर रविवारी भाजी खरेदीसाठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला असतो. महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गर्दी कमी केली नाही तर भाजी विक्रीच बंद केली जाईल, असा इशारा देऊनही परिस्थिती सुधारलेली नाही. या उलट गर्दी वाढतच आहेत. रविवारीही लक्ष्मीपुरी येथील फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज, पद्माराजे विद्यालयासमोरील परिसर, निवृत्त चौक या ठिकाणी भाजी विके्रते आणि खरेदीदारांनी गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने शेतकऱ्यांना शहरात भाजी विक्रीसाठी येण्यास अडचणी येत आहेत. यामध्येच भाजी मंडई बंद आहे. वाहने नसणाऱ्यांचे हाल होत असून डोक्यावरून पोती आणण्याची वेळ येत आहे. त्यामुळे काही विके्रते मिळेल त्या चौकात विक्री करण्यास बसत आहेत. परिणामी फूटपाथ, रस्त्याकडेला त्यांची गर्दी होत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार