३९ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ३८२ उमेदवार निवडून येणार आहेत. यात ३४ अनुसूचित जातींमधील असणार आहेत. ४७ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गातील आहेत. ५४ नागरिकांचा मागास वर्ग स्त्री, २० अनुसूचित जाती स्त्री, १३८ सर्वसाधारण व ८९ अनारक्षित असून एकूण मतदार संख्या ९१३५७ इतकी असणार आहे. यात ४७,६५३ हे पुरुष मतदार असून ४३,९४४ या स्त्री मतदार असणार आहेत. इतर मतदार २ आहेत. १५६ मतदार केंद्रे १३० प्रभाग राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचारी आहेत.
मतमोजणी १८ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून नगरपरिषद सांस्कृतिक हाॅल पन्हाळा येथे ९ फेऱ्यांमध्ये १८ टेबलवर पार पडेल.