शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

‘स्थायी’वर आदिल फरास यांची बाजी

By admin | Updated: January 3, 2015 00:15 IST

महापालिका निवडी : १३ विरुद्ध २ मतांनी मृदुला पुरेकर पराजित; ‘महिला बालकल्याण’पदी लीला धुमाळ, उपसभापतिपदी रेखा आवळे

कोल्हापूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महानगरपालिकेच्या ३७व्या स्थायी समिती सभापतिपदी आज, शुक्रवारी राष्ट्रवादीचे आदिल फरास यांनी बाजी मारली. त्यांनी जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार मृदुला पुरेकर यांच्यावर १३ विरुद्ध २ मतांनी विजय मिळविला. महिला व बालकल्याण सभापतिपदी कॉँग्रेसच्या लीला धुमाळ, तसेच उपसभापतिपदी रेखा आवळे यांची बिनविरोध निवड झाली; तर उत्कंठा लागून राहिलेल्या परिवहन सभापतिपदाची निवड न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी घेतला. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली व जोरदार आतषबाजी करीत जल्लोष केला.सकाळी साडेदहाच्या सुमारास कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवरून थेट महापालिकेत आले. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीतर्फे आदिल फरास, तर जनसुराज्य पक्षातर्फे मृदुला पुरेकर यांनी अर्ज दाखल केला होता. १५ सदस्यांनी हात वर करून मतदान केले. भाजपच्या प्रभा टिपुगडे गैरहजर राहिल्या. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कोट्यातील १३ मते फरास यांना मिळाली, तर शिवसेनेचे संभाजी जाधव यांनी पुरेकर यांना साथ दिली. शिवसेना व भाजपने पुरेकर यांना पाठिंबा दिला. महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी कॉँग्रेसच्या लीला धुमाळ यांचा एकच अर्ज आल्याने निवडीची जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली. उपसभापतिपदी रेखा आवळे यांचीही बिनविरोध निवड झाली.कॉँग्रेसचे अजित पोवार व ‘जनसुराज्य’चे प्रकाश नाईकनवरे यांनी परिवहन सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले होते. स्वीकृत सदस्य शशिकांत पाटील यांची पोवार यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही असल्याने याबाबत आक्षेप घेत त्यांचा अर्ज बाद ठरविण्याची विनंती नाईकनवरे यांनी न्यायालयास केली होती. याबाबत महापालिका आयुक्त, नगरसचिव व पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊन ९ जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोवार व नाईकनवरे यांनी वकिलांची फौज बाजू मांडण्यासाठी आणली होती. वकिलांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. नाईकनवरे यांनी लेखी अर्जाद्वारे बाजू मांडली. यानंतर न्यायालयीन प्रक्रिया व निर्णयाचा भाग बनलेल्या परिवहन सभापतिपदाची निवड स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. (प्रतिनिधी)सुस्कारा अन् चिंतास्थायी सभापतिपदासाठी पुरेकर यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सदस्यांना ‘व्हिप’ बजावले होते. दगाफटका नको, यासाठी सदस्यांना अज्ञातस्थळी हलविले. यातच परिवहन सभापतिपदासाठी कॉँग्रेसच्या अजित पोवार यांचा अर्ज बाद ठरल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे निवडीबाबत कमालीची उत्सुकता व तणाव नगरसेवक ांत होता. ‘स्थायी’च्या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुस्कारा सोडला. मात्र, न्यायालयीन कचाट्यात परिवहन सभापतीची निवड अडकल्याने कॉँग्रेसच्या गोटात शांतता व चिंता होती.आरोग्य सेवा सुधारण्यावर भर राहील. अंबाबाईच्या दर्शनानिमित्त येणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा देण्याबाबत मास्टर प्लॅन तयार करणार. रंकाळा व पंचगंगा प्रदूषण मुक्ती हे विषय अग्रक्रमाने विषयपत्रिकेवर असतील. पाईपलाईन व शहरांतर्गत रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती यासाठी पाठपुरावा करू. कारकिर्दीत महापालिकेची रुग्णालये अद्ययावत झालेली दिसतील. - आदिल फरास, स्थायी सभापतीमहिलांना स्वयंरोजगार मिळावा, तसेच समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा व वस्तू या वेळेत मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करू. गरजू महिलांना अनुदान स्वरूपात वाटप करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंचा दर्जा व उपयोग यांचा ताळमेळ घालून त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील, याची काळजी घेऊ.- लीला धुमाळ, सभापती, महिला व बालकल्याण समिती