कोल्हापूर : पदवीच्या प्रथम वर्षासाठी अतिरिक्त ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार शासनाने विद्यापीठाला दिले आहेत. त्याबाबतचे पत्र आज, गुरुवारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव नि. भा. मराळे यांनी शिवाजी विद्यापीठाला पाठविले आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्णांतील २५ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागला आहे.महाविद्यालयांना पदवीच्या प्रथम वर्षासाठी मंजूर क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयाला दोनशेपट दंड करण्याची भूमिका शासन आदेशानुसार विद्यापीठाने घेतली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार होते. त्यावर तोडगा करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याशी तीन दिवसांपूर्वी बैठक झाली. यात टोपेंच्या सूचनेनुसार विद्यापीठाने काल, बुधवारी अतिरिक्त प्रवेशाबाबतचा सविस्तर प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केला होता.
अतिरिक्त प्रवेशाचे अधिकार
By admin | Updated: July 4, 2014 00:53 IST