नूल : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) या गावातील प्रगतशील शेतकरी माजी सरपंच संभाजी कुराडे यांनी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर ४० गुंठे कोरडवाहू जमिनीत ८५ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. २० ते २५ पेरे आणि सरासरी १२ फूट उंचीचा ऊस गेल्या महिन्यातील पावसाने पडला होता. कृषी विभाग गडहिंग्लजच्या सहायक कृषी अधिकारी सुरेखा शिंदे यांच्या मार्गदर्शनातून को-८००५ या जातीच्या ऊस बेण्याची परंपरागत पद्धतीने लागण केली होती. येणेचवंडी लघु पाटबंधारे तलावातून वैयक्तिक उपसा जलसिंचनद्वारे पाणी वापरून त्यांनी हे उत्पादन घेतले. खर्च वजा जाता निव्वळ दोन लाखांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------
फोटो ओळी : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील प्रगतशील शेतकरी संभाजी कुराडे यांनी घेतलेले विक्रमी उसाचे उत्पादन.
क्रमांक : २४०१२०२१-गड-०७