कोल्हापूर : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे स्मरणार्थ दिला जाणारा अकरावा कलायात्री पुरस्कार निर्माते,दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना शुक्रवारी जाहीर झाला. शाहू स्मारक भवनात १ मार्चला सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.बालवयापासून हिंदी व मराठी सिनेसृष्टी गाजविणारे अभिनेते आणि धुमधडाका, दे दणादण, थरथराट, झपाटलेला असे अनेक मराठी चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक तसेच जय मल्हार, विठू माऊली आणि दख्खनचा राजा ज्योतिबा अशा मालिकांचे कोठारे निर्माते आहेत. पुरस्कार वितरणानंतर कमला कॉलेजचे प्रा.डॉ.सुजय पाटील त्यांची मुलाखत घेणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक जयश्री दानवे, राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर यांनी दिली आहे.गेली ३५ वर्षे वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमाद्वारे जयशंकर दानवे या कलाकाराचे स्मरण दानवे परिवारातर्फे केले जाते. २०११ सालापासून हे कलायात्री पुरस्कार सुरु झाले असून हा पुरस्कार नाटक, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमातील रंगकर्मींना देण्यात येतो. आजपर्यंत दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ.गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर यांना पुरस्कार दिला आहे.
अभिनेते महेश कोठारे यांना नटश्रेष्ठ दानवे कलायात्री पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 19:05 IST
Mahesh Kothare Kolhapur- नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे स्मरणार्थ दिला जाणारा अकरावा कलायात्री पुरस्कार निर्माते,दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना शुक्रवारी जाहीर झाला. शाहू स्मारक भवनात १ मार्चला सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अभिनेते महेश कोठारे यांना नटश्रेष्ठ दानवे कलायात्री पुरस्कार
ठळक मुद्दे अभिनेते महेश कोठारे यांना नटश्रेष्ठ दानवे कलायात्री पुरस्कारशाहू स्मारक भवनात १ मार्चला सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा