पिराजी आप्पा चौगले व त्यांचा मुलगा मनोहर यांचा मे महिन्यात चार दिवसांत मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे असतानाही डॉ. पाटील यांनी कोणतीही चाचणी न करता २० एप्रिल ते २६ एप्रिल असे आठवडाभर उपचार केले. प्रकृती बिघडल्यावर कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे उपचार करूनही १५ दिवसांत दोघांचा मृत्यू झाला. नातेवाइकांना न जुमानता त्यांनी केलेला चुकीचे उपचार, हलगर्जीपणा केल्यामुळे घरातील दोन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. याला ते जबाबदार असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
महिन्यापूर्वी याबाबत निवेदन दिले होते. मात्र, या काळात कसलीही चौकशी केलेली नाही. त्यामुळे याबाबत कुटुंबीयांना पंचायत समिती समोर उपोषण बसावे लागेल, असा इशारा दिला आहे.