शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर बियाणे कंपन्यांवर कारवाई

By admin | Updated: June 14, 2016 00:46 IST

कृषी अधिकाऱ्यांचा इशारा : बियाणे विक्रीचा आढावा; विक्रेत्यांना वेठीस धरणाऱ्यांचे धाबे दणाणले

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --बियाणे पुरवठा करताना विक्रेत्यांना वेठीस धरणाऱ्या कंपन्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. येत्या दोन दिवसांत बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची बैठक घेऊन विक्रीचा आढावा घेतला जाणार असून त्यामध्ये दोषी आढळलेल्या कंपन्यांचा ‘परवाना रद्द’च्या कारवाईचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांकडून आगाऊ पैसे घेऊन बियाण्यांचा पुरवठा न करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. यंदा खरिपाचे क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची बियाण्यांची गरज वाढणार असल्याने बियाणे व खते विक्रेत्यांनी जानेवारीपासूनच याची तयारी केली होती. त्यासाठी कंपन्यांना बुकिंग केलेल्या भात, सोयाबीन बियाण्यांची संपूर्ण रक्कम आगाऊ दिली होती. लाखो रुपयांची गुंतवणूक करून कंपनीकडून बियाणे येणार म्हणून विक्रेत्यांनी स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांकडून बुकिंग करून घेतले होते. गेली महिनाभर विक्रेत्यांनी बियाणे पुरवठा करण्यासाठी कंपन्यांचे उंबरठे झिजवले, पण केवळ बुकिंग मालाच्या निम्माच बियाण्यांचा पुरवठा केल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत. मालही देईनात आणि पैसेही परत करत नाहीत. पैसे मागितले तर पुढील वर्षी मालच देणार नसल्याची तंबी देत असल्याने विक्रेत्यांना तोंड दाबून मुक्याचा मार सहन करावा लागत आहे. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारच्या अंंकात ‘बियाणे कंपन्यांकडून विक्रेत्यांना ठेंगा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी घेतली. त्यांनी याबाबतची संपूर्ण माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित कंपन्यांची आढावा बैठक घेऊन बियाण्यांची मागणी व पुरवठा याची माहिती घेऊन दोषींवर थेट ‘परवाना रद्द’ची कारवाई करण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे. तुलनात्मक पेर क्षेत्र, हेक्टरमध्ये पीकगतवर्षीयंदाभात१ लाख ३ हजार१ लाख १० हजार सोयाबीन४२ हजार ९००५३ हजार ६००भुईमूग४८ हजार २००५२ हजार १००तूर२८ हजार३० हजारमूग१४ हजार३५ हजारउडिद१५ हजार३० हजार ऊस१ लाख ४५ हजार१ लाख ३२ हजार