शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी करून न घेणाऱ्या स्कूल बसवर आता कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:09 IST

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्णातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांची ने-आण करणारे स्कूल बसचालक अथवा संस्थांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आपल्या बसेस शाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करून घ्याव्यात; अन्यथा अशा बसचालक व संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिला आहे.महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१० नियमावलीअंतर्गत ‘स्कूल बस नियम व विनियम २०११’प्रमाणे शालेय शिक्षण ...

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्णातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांची ने-आण करणारे स्कूल बसचालक अथवा संस्थांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आपल्या बसेस शाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करून घ्याव्यात; अन्यथा अशा बसचालक व संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिला आहे.महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१० नियमावलीअंतर्गत ‘स्कूल बस नियम व विनियम २०११’प्रमाणे शालेय शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना, शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाºया बसबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार दरवर्षी शाळांना सुट्ट्या पडल्यानंतर स्कूल बसची तपासणी केली जाते. सुट्टीचा महिना अर्ध्यावर आला तरी अनेक शाळांमध्ये स्कूल बस सेवा देणारे कंत्राटदार, संस्था यांनी अद्यापही आपल्याकडे असलेल्या स्कूल बसेसची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून घेतलेली नाही. त्यामुळे ३१ मेअखेर तपासणी न करून घेणाºया अशा संस्था, व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे.पालकांचेही दुर्लक्ष नकोस्कूल बसमधून मुलांची सुरक्षितरीत्या ने-आण व्हावी, सुरक्षेचे नियम पाळले जावेत, याकरिता प्रत्येक शाळेत परिवहन समिती नेमणे गरजेचे आहे. मात्र, अद्यापही अशा प्रकारे शाळांमध्ये समिती नेमलेली नसल्याची बाब नुकत्याच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समोर आली आहे. तरी पालकांनी व संस्थांनी याकडे दुर्लक्ष करू नये, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.स्कूल बसचालकांची या नियमांवर तपासणीशाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बसथांबे निश्चित करणे, प्रत्येक शाळेची परिवहन समिती नेमणे, वाहनांची कागदपत्रे, जसे नोंदणी प्रमाणपत्र, शालेय बसमध्ये प्रशिक्षित चालक, एक पुरुष व एक महिला परिचर हे पाहणे. सर्व कर्मचारी कंत्राटदाराने दिलेल्या ओळखपत्रांसह स्वच्छ गणवेशात असणे आवश्यक आहे.चालकाला वाहतुकीच्या कोणत्याही गुन्ह्णासाठी दंड झालेला नसावा. वाहतुकीची अनुज्ञाप्ती, बिल्ला असणेही आवश्यक आहे. यासह बसमागे ३९ बाय २३ इंचांची आपत्कालीन खिडकी असणे गरजेचे आहे. हा दरवाजा उघडल्यानंतर दिवा अथवा घंटा वाजण्याची यंत्रणा बसमध्ये आवश्यक आहे. वाहनाचा वेग ४० किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक नसावा. स्कूल बसमध्ये या सर्व बाबी अंतर्भूत आहेत की नाहीत, याची तपासणी केली जाते.