शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया’चा २५० युवकांना दणका-- पंधरा दिवसांतील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:45 IST

कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच युवतींची छेड काढणाºया

ठळक मुद्देअसभ्य वर्तनाबरोबरच युवतींची छेड काढणाºयांना पकडलेपथकांना स्वतंत्र ड्रेसकोड व दिमतीला वेगवान दुचाकी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच युवतींची छेड काढणाºया २५० युवकांवर निर्भया पथकाने गेल्या पंधरा दिवसांत कारवाई केली. कॉलेजला जातो, म्हणून घरातून बाहेर पडलेल्या मुलांचे पराक्रम पाहून पालकांना चिंता लागली आहे. रेकॉर्डवर येणाºया अशा तरुणांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला वेळीच सावरावे, असे मत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केले.

‘निर्भया’ पथकाने विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज (दसरा चौक), महावीर कॉलेज (बस स्टॉप), कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, आझाद चौक, शाहू मैदान, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, विद्यापीठ हायस्कूल, भवानी मंडप, शिवाजी चौक बसस्टॉप, गंगावेश बसस्टॉप, के.एम.सी. कॉलेज, न्यू कॉलेज (परिसर), पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमती गर्ल्स हायस्कूल चौक, भोई गल्ली, एन.सी.सी. भवन परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, केआयटी कॉलेजकडे जाणारा रस्ता व भारती विद्यापीठ परिसर, रंकाळा परिसर, महावीर गार्डन यांसह कॉलेज परिसरातील पानटपरी, हॉटेल, आइस्क्रीम पार्लर, कँटीन, आदी ठिकाणी युवतींची छेड काढणे, अशा २५० युवकांना खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यांच्या कारवाईची चाहूल कोणालाच लागत नाही. छेडछाड करीत असल्याचे व्हिडिओ शूटिंग करून त्याला पकडले जाते.जिल्ह्यात दहा पथकेयुवती व महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात दि.८ आॅगस्ट २०१६ रोजी ‘निर्भया’ पथकाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यांमध्ये दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांना स्वतंत्र ड्रेसकोड व दिमतीला वेगवान दुचाकी दिल्या आहेत. या निर्भया पथकामुळे आम्ही घराबाहेर पडल्यानंतर परत घरी येईपर्यंत सुरक्षित आहोत, अशा प्रतिक्रिया युवतींनी व्यक्त केल्याचे मत डॉ. अमृतकर यांनी व्यक्त केले.अशी होते कारवाईसार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन व छेडछाड करणाºयांवर महाराष्टÑ पोलीस अ‍ॅक्ट ११०/११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. या कलमाखाली कारवाई होणाºया तरुणांची पोलीस रेकॉर्डला नोंद होऊन त्यांच्या हालचालींवर नेहमी पथक लक्ष ठेवते.