कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : येथील नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. मागील विषयांचे इतिवृत्त वाचन करण्याच्या विषयावरून उपनगराध्यक्ष जवाहर पाटील व विरोधी पक्षनेता रामचंद्र डांगे यांच्यात वादावादी होऊन प्रकरण अखेर हातघाईवर आले.उपनगराध्यक्ष पाटील आणि विरोधी पक्षनेता डांगे, नगरसेवक उदय डांगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या या हाणामारीमुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. हाणामारीमुळे सभेला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)
कुरुंदवाड पालिकेच्या सभेत हाणामारी
By admin | Updated: February 23, 2017 03:56 IST