शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: June 9, 2017 00:06 IST

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ठराव मलकापूर नगरपालिकेच्या विशेष सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर होते.प्रभारी मुख्याधिकारी तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी स्वागत केले. पालिकेच्या सेवेत असणारे विविध विभागांतील कर्मचारी यांनी नगरविकास दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काही कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला होता. कामावर वेळेवर न येणे, कामावर आले तर कामाच्या नावाखाली कार्यालयाबाहेर फिरणे तसेच नागरिकांची कामे वेळेवर न करणे, आदी प्रकार वाढून कर्मचारी यांच्याबाबत नागरिकांनी पदाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने बांधकाम सभापती राजू प्रभावळकर यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. सभेत चर्चा होऊन अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला.पालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या पालिका कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान रजावेतन देण्यास मंजुरी देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुटीच्या बदल्यात वेतन देण्याचा ठराव केला. वार्षिक निविदा विविध योजनेतून मंजूर झालेल्या टेंडरबाबत कमी दराच्या निविदा मंजूर फेरटेंडर नोटीस काढण्यास सर्वांनुमते ठरवण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचारी कामिनी हरी पंडत यांच्या वारस रत्नप्रभा हरिचंद पंडत यांना पालिकेच्या सेवेत घेण्याचा ठराव करण्यात आला. पालिकेचे वरिष्ठ कर्मचारी बाबूराव गांधी यांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.इंजिनिअर राजेश लाड यांना फेरनिविदा काढेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, तर राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्याची मागणी विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील यांनी केली. राज्यातील शेतकरी कर्जमुक्त झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करा, असे राजू प्रभावळकर यांनी सांगितले.सभेत नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक राजू प्रभावळकर, भारत गांधी, विकास देशमाने, सुहास पाटील, बाबासाहेब पाटील, मानसिंग कांबळे, संगीता पाटील, माया पाटील, अश्विनी लोखंडे, सोनिया शेंडे, आण्णा पळसे, नम्रता कोठावळे, आदींनी चर्चेत भाग घेतला.