कोपार्डे - कुंभी कासारी कारखाना येथे अवैध माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉली चालकांना पकडून त्यांच्याकडून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सांगरूळचे मंडल अधिकारी सुहास गोदे,तलाठी राजाराम चौगले यांनी केली.
करवीर तालुक्यातील सांगरूळ, कुंभी कासारी साखर कारखाना मार्गाने आज सकाळपासून ट्रॅक्टरने-ट्रॉलीने अवैध माती उत्खनन करून वाहतूक सुरू होती. सांगरूळचे मंडल अधिकारी सुहास गोदे यांनी याची माहिती मिळताच कुडित्रेचे तलाठी राजाराम चौगले, कोतवाल युवराज पाटील यांच्यासह या मार्गावर पहाणी करत असताना कुंभी कारखान्यावर या अवैध माती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला पकडले. त्यांच्याकडे उत्खननाची रॉयल्टी भरली नसल्याने या दोन्ही ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुहास गोदे यांनी पंचनामा करून या ट्रॅक्टर मालकाकडून १०० ब्रास उत्खननापोटी २० हजार दंड वसूल करण्यात आला.
चौकट १)मार्च एंडच्या तोंडावर कारवाई - करवीर तालुक्यात अनेक ठिकाणी माती उत्खनन होत आहे. नदीकाठ अक्षरशः २० फुटाच्या आवटी खाली बसवल्याने नदीच्या बाजूला समांतर मोठी तळी निर्माण झाली आहेत. रात्रीच्या वेळेला माती अवैधपणे काढली जात असली तरी महसूल विभागाला त्याचा पत्ता लागत नसल्याने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवला जातो. (फोटो) कुंभी कासारी साखर कारखाना येथे अवैध माती वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरवर पंचनामा करून मंडल अधिकारी सुहास गोदे,तलाठी राजाराम चौगले,कोतवाल युवराज पाटील यांनी दंडात्मक कारवाई केली