शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावापेक्षा कमी दराने साखर विकल्यास कारवाई; केंद्राचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 07:21 IST

Sugar News : हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री केल्यास, तसेच कोटा मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने  साखर कारखान्यांना दिला आहे. 

- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री केल्यास, तसेच कोटा मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिला आहे. तसेच याचे काटेकोरपणे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित राज्यांना देण्यात आल्या आहेत.अनेक साखर कारखान्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने साखर विक्री सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी सर्व साखर कारखाने, साखर आयुक्त आणि ऊस आयुक्तांना पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देता यावा. त्यांच्याकडील रोखता वाढावी यासाठी ७ जून २०१८ रोजी कारखान्यांसाठी साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला आहे. तसेच बाजारातील मागणी पुरवठ्याचा समतोल साधला जावा यासाठी खुल्या बाजारात किती साखर विकायची यासाठी प्रत्येक कारखान्याला दरमहा कोटा आणि साठामर्यादा ठरवून देण्यात आली आहे.त्यामुळे देशातंर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखर विक्री करू नये, तसेच देण्यात आलेल्या मासिक कोटा आणि साठा मर्यादेचे उल्लघंन करू नये. राज्य सरकारांनीही यावर देखरेख ठेवावी याचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील तरतुदीनुसार कारवाई करावी.कोटा मर्यादेचे उल्लघंन केल्यास ....कारखान्यांनी त्यांना देण्यात आलेल्या कोट्यापेक्षा जादा साखर विकल्याचे आढळून आल्यास पुढील महिन्याच्या कोट्यातून ती साखर कमी केली जाईल. तसेच आवश्यक ती अन्य कारवाईही केली जाईल. मार्च महिन्यापासून याची अंमलबजावणी केली जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकार