कोल्हापूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने लागू केलेले नियम आणि निर्बंधांचे पालन न करणाऱ्या शहर आणि जिल्ह्यातील ३ हजार ६८७३ हजार ६८७ दुकानदारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. विनाकारण फिरताना आढळलेल्यांकडून २० हजार ७३८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यातील ही कारवाई आहे.
कोरोना प्रसार रोखण्यासाठी तीन महिन्यांपासून विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर दुकाने उघडण्यास परवानगी नव्हती. तरीही उघडण्यात आलेल्या ३ हजारांवर दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरताना आढळलेल्या ८४ हजार २५४ जणांना १ कोटी ४६ लाख ३८ हजारांचा दंड करण्यात आला. मोटरवाहन कायद्यांतर्गत १ लाख ७१ ३५६ हजार वाहनधारकांकडून ३ कोटी १७ लाखांचा दंड करण्यात आला. लॉकडाऊन असताना मॉर्निंगवॉकला गेलेल्या २ हजार ६६५ जणांकडून १० लाख ५३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.