शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई :आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:03 IST

महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शाहू क्लॉथ मार्केट येथील के. एम. टी. कार्यालय, रेकॉर्ड विभाग, घरफाळा विभाग व नागरी सुविधा (सी.एफ.सी.) केंद्राची पाहणी केली. महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाºयांना वारंवार बाहेर जाऊ नये, जायचे झाल्यास नोंदवहीत नोंद करूनच जावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देवारंवार बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई :आयुक्तांचा इशाराकेएमटी, रेकॉर्ड, सीएफसी सेंटरची पाहणी

कोल्हापूर : महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शाहू क्लॉथ मार्केट येथील के. एम. टी. कार्यालय, रेकॉर्ड विभाग, घरफाळा विभाग व नागरी सुविधा (सी.एफ.सी.) केंद्राची पाहणी केली. महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना वारंवार बाहेर जाऊ नये, जायचे झाल्यास नोंदवहीत नोंद करूनच जावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.रेकॉर्ड व सी. एफ. सी. सेंटरकडील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दाखल्यासाठी व रेकॉर्डसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे, नमस्कार करून स्वागत त्यांचे करावे, त्यांना आवश्यक ते दाखले अथवा रेकॉर्ड कसे जागेवर तत्काळ देता येतील याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या.

तसेच के.एम.टी. कडील चालक व वाहक यांनी बसमध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांचे नमस्कार करून स्वागत करावे, त्यांना चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी, के.एम.टी.चे उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.सकाळी आयुक्तकलशेट्टी यांनी खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीमध्ये सर्व खाते प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी वेळेवर हजर राहतात का नाहीत ते पाहावे. दर महिन्याची हजेरी आस्थापना विभागाकडे पाठविण्यापूर्वी आपले अधिनस्त सर्व कर्मचारी सकाळी दहा वाजेपर्यंत हजर आहेत का, हे तपासावे.

या वेळेनंतर आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या. कर्मचारी वांरवार आॅफिसच्या बाहेर जाता कामा नयेत, जायचे झालेस नोंद वहीमध्ये कोणत्या कामासाठी जाणार याची नोंद ठेवावी, असे सांगितले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, उपशहर अभियंता बाबूराव दबडे व रेकॉर्ड, के.एम.टी. विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर