शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर उद्यापासून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 12:04 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील परवाना असताना शहरात प्रवेश करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांनी हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर उद्या, शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई ...

ठळक मुद्देहद्दीचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर उद्यापासून कारवाईशहर वाहतूक शाखेचा निर्णय

कोल्हापूर : ग्रामीण भागातील परवाना असताना शहरात प्रवेश करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांनी हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर उद्या, शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. यात पहिल्या टप्प्यात समज आणि दुसऱ्या टप्प्यात थेट दंडात्मक कारवाई होणार आहे.शहरातील प्रमुख मार्गावर रोज वाहतूक कोंडी होत आहे. यात शहरातील दुचाकी, चारचाकी, तीन आसनी रिक्षा यांच्यासह ग्रामीण परवानाधारक रिक्षांचीही भर आहे. विशेष म्हणजे ग्रामीणमध्ये व्यवसाय करण्याचा परवाना असताना हे रिक्षाचालक शहराच्या हद्दीत व्यवसाय करीत आहेत.

अशा रिक्षांना शहरात व्यवसाय करावयाचा असेल तर त्यांनी मीटरप्रमाणे करावा, न त्यापेक्षा ठरवून दिलेल्या हद्दीत व्यवसाय करावा. यात सायबर चौक मागील बाजू, टेंबलाई मंदिर मागील बाजू, ताराराणी पुतळा चौक, फुलेवाडी, नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा अशा ठरवून दिलेल्या ठिकाणीच या रिक्षाचालकांना व्यवसाय करता येणार आहे.

जे रिक्षाचालक हद्दीचा भंग करतील त्यांच्यावर आज, गुरुवारपासून समज आणि उद्या, शुक्रवारपासून थेट कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. याबाबत विविध रिक्षाचालक संघटनांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांची रिक्षाचालकांसह भेट घेतली. त्यावेळी रिक्षाचालकांना नेमून दिलेल्या हद्दीत व नियमांची पूर्तता करून व्यवसाय करण्याची सूूचना पोलीस निरीक्षक बाबर यांनी दिली. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूरauto rickshawऑटो रिक्षा