शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करा

By admin | Updated: February 11, 2017 00:25 IST

नानासाहेब पाटील : विवेकानंद महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान

कोल्हापूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटर, इंटरनेट आॅफ थींग्ज अशा तंत्रज्ञानाने मानवी समाजातील सर्वच क्षेत्रे प्रभावित होत असून रोजगारनिर्मितीत घट होत आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये प्रत्येकाने आत्मसात करायला हवीत, असे प्रतिपादन निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी शुक्रवारी केले.विवेकानंद कॉलेजतर्फे विज्ञान दिनानिमित्त शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे आयोजित व्याख्यानात ‘नवनवीन वैश्विक तंत्रज्ञान आणि मानवी समाजाचे भान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे होते.पाटील म्हणाले, २००७ साली यू ट्यूबची सुरुवात, अ‍ॅँड्रॉईडचा विकास, इंटरनेट वापरकर्त्यांत वाढ, ‘आयबीएम’ने माणसासारख्या वागणाऱ्या रोबोची केलेली निर्मिती यांमुळे हे वर्ष क्रांतिकारी ठरले. त्यानंतर प्रत्येक ठरावीक अंतराने तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत गेले आहेत. प्रत्येक चार वर्षांत नवे तंत्रज्ञान येत आहे. संगणक, सायबर स्पेस तंत्रज्ञानाची ही चौथी औद्योगिक क्रांतीच म्हणावी लागेल. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत संपर्काच्या साधनांमध्येही बदल घडून आले आहेत. रोबोटिकसारख्या तंत्रज्ञानाचा वापर व्यापार, उद्योग, शिक्षणव्यवस्था, घरगुती दैनंदिन कामासह मोठ्या हॉस्पिटलमध्येही होत आहे. मायक्रो फिश रोबो तर अचूक रोगनिदान करण्यासाठीही आता वापरला जात आहे. मानवी प्रयत्नांना शक्य नाही अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान अचूकपणे व वेगाने काम करते. त्यामुळे मानवापेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वच क्षेत्रांत प्रभावी ठरत असून, जगभरातील रोजगारांत घट होत आहे. सध्या माहिती संशोधक, यूएक्स डिझायनरला मोठी मागणी आहे. अशा क्षेत्रांची करिअरच्या दृष्टीने निवड करायल्ाा हवी. प्रा. राजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. हिंदूराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नानासाहेब पाटील म्हणाले, युवा पिढीने उच्च प्रतीचे ध्येय बाळगायला हवे.प्रत्येक शाळा, महाविद्यालयात ‘टेक्नॉलॉजी स्कूल’ व्हायला हवे.‘आयबीएम’ने तयार केलेले ‘वॅटसन सॉफ्टवेअर’ हे मानवी प्रगतीचे सर्वांत मोठे प्रतीक आहे.