शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

‘बिद्री‘वरील आरोप केवळ स्टंटबाजीतूनच

By admin | Updated: September 26, 2015 00:19 IST

प्रवीणसिंह पाटील : विरोधकांचा दिशाभुलीचा प्रयत्न

सरवडे : बिद्री साखर कारखान्यावर सर्व देणी धरून २0५ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा केवळ कांगावा आहे. त्यांनी या तालुक्यातील तुलना केलेल्या कारखान्यांचे अहवाल तपासल्यास ‘बिद्री’पेक्षाही वाढीव कर्ज व देणी त्यांना दिली असती; परंतु केवळ स्टंटबाजीसाठी केलेले आरोप धांदात खोटे आहेत. बिद्रीच्या बारदान खरदी कोणत्या महिन्यात केली जाते. बिद्रीचा दर हा करासहीत तर अन्य कारखान्यांचे दर हे कर विरहित आहेत. त्यामुळे खरेदीत घोटाळ्याचा आरोप करताना विरोधकांनी आपल्या कारकिर्दीत कशा पद्धतीने खरेदी केली हे तपासून पाहावे, असा टोला बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी लगावला.बिद्री साखर कारखान्यावर आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युउत्तर देताना ते पत्रकार बैठकित बोलत होते.पाटील म्हणाले, २0१४-१५ च्या वार्षिक अहवालातील केवळ कर्जाची आकडेवरी प्रसिद्ध करून राजकीय स्टंटबाजी केली आहे. साखर तारणावरील खेळते भांडवली कर्ज ८७ कोटी असल्याचे सांगत असताना कारखान्याकडे त्या कर्जाला तारण दिलेल्या साखरेची बाजार भावाप्रमाणे १४0 कोटी किंमत असल्याचे अहवालात नमूद केले. सहवीज प्रकल्पासाठी घेतलेले ३१ कोटी कर्ज हे निदर्शनास आणताना त्या प्रकल्पातून एम. एस. सी. बँकेचे ६0 कोटी कर्ज व्याजासह परतफेड केल्याचे देखील या अहवालात आहे. उर्वरित ३१ कोटी कर्ज ३१ मार्च रोजी होते. ते सध्या २८ कोटी आहे. हे कर्ज केंद्र शासनाचे एस. डी. एफ. फंडातील चार टक्के व्याजाने असून, ते पुढील चार वर्षांत परतफेड करावयाचे आहे.पाटील म्हणाले, कर कर्ज २0१३- १४ ची एफ.आर.पी.देण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून के.डी.सी. बँकेतून २१ कोटी ५0 लाखांचे कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड २0१६- १७ ते पुढील तीन वर्षांत करावयाची आहे. कर्जाचे व्याज केंद्र शासनाकडून केले जाते. १७ कोटी ठेवी या ऊस बिलातील व ऐच्छिक ठेवी असून त्याची मुदतीत परतफेड सुरू आहे. ५३ लाख शासकीय देण्यांपैकी ३१ मार्च नंतर ३५ लाखांची देणी आदा केलेली आहेत.ते म्हणाले, कोट्यवधी रुपयांच्या कर्जात असणारा कारखाना सभासदांनी राजे विक्रमसिंह घाटगे, आमदार हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या हाती सत्ता दिली. त्या विश्वासास पात्र राहून कारभार केला आहे. मात्र, विरोधक सत्तेच्या हव्यासापोटी सभासदांची दिशाभूल करीत आहेत. (वार्ताहर)