रूकडी माणगाव : माणगाव (ता. हातकणंगले) येथील अमोल गुंडा परीट (वय ३६)
याचा अंकली-मिरज येथे अपघाती मृत्यृ झाला. हा अपघात गुुुुुुरुवार दुपारी तीनच्यादरम्यान घडला.
अमोल परीट हा गांधीनगर येथील एका कापड दुकानात वाहनचालक म्हणून काम करत होता. कापडपेढीची कार घेऊन तो अन्य दोन सहकाऱ्यांसह वसुलीसाठी मिरज येथे जात असताना, धामणी येथील रजपूत हाॅटेलसमोर अपघात झाला. एकेरी मार्गावरून समोरून भरधाव चारचाकी वाहन समोरासमोर धडकले. यामध्ये अमोल परीटच्या छातीवर वाहनाच्या स्टेअरिंगचा दाब पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला व अन्य दोघा जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान परीट याचा मृत्यू झाला.
परीट याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
१९अमोल परीट