शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातील वारकरी महिलेचं दिंडी सोहळ्यात अपघाती निधन: गावात पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 22:18 IST

पंढरपूर आषाढी वारीसाठी आळंदीमधून पायी दिंडी सोहळ्यासाठी वाशी ता.करवीर येथून ९ जून रोजी आळंदीकडे  प्रस्थान झाले

सडोली (खालसा) - आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वाशी (ता.करवीर) येथील वारकरी महिलेचा सासवड येथे ट्रॉलीखाली सापडून जागीच मुत्यू झाला. सोनाबाई मारुती कुंभार वय(७०) असे त्या मृत वारकरी महिलेचे नाव असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेले आबासो पाटील ही गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी दुर्घटनेने वाशी गावावर पसरली शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर आषाढी वारीसाठी आळंदीमधून पायी दिंडी सोहळ्यासाठी वाशी ता.करवीर येथून ९ जून रोजी आळंदीकडे  प्रस्थान झाले. या दिंडी सोहळ्यासाठी वाशी व परिसरातून ६२ वारकरी सहभागी झाले होते. आळंदीहून मजल दर मजल करत हा दिंडी सोहळा गुरुवारी संध्याकाळी सासवड येथे मुक्कामासाठी थांबला होता. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता सासवड येथून दिंडीतील चालणाऱ्या लोकांनी पायी चालत वारकरी दिंडी मार्गाने पुढे निघून गेलेत व साहित्य असणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीत बसलेले सात ते आठ वारकऱ्यांना घेऊन दिंडी मार्गाच्या दिशेने पंढरपूरकडे निघाला होता.

दरम्यान ट्रालीमध्ये बसलेल्या सोनाबाई मारूती कुंभार यांनी वाशी गावची दिंडी दिसल्यानंतर ट्रॉलीमधून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा दांडीवरून पाय घसरल्याने त्या सरळ ट्रालीच्या चाकात सापडल्याने ट्रॉलीचे चाक छातीवरून गेल्याने त्याचा जागीच मुत्यू झाला. सोनाबाई कुंभार यांना वाचवण्यासाठी गेलेले आबासो पाटील हेही ट्रॉलीखाली सापडल्याने ते ही गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर सासवड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघाताची नोंद सासवड पोलीस ठाण्यात झाली आहे. त्याच्या पश्चात मोठा परिवार असून मनमिळावू स्वभावाच्या असल्याने त्याच्या या अपघाती निधनाने गावावर शौककळा पसरली होती. 

वारीचा लळा

सोनाबाई कुंभार  विठ्ठल भक्त होत्या. किर्तन भजनासह सतत विठू नामाच्या गजरात काय तल्लीन असायच्या  सोनाबाई कुंभार यांच्या मृत्यूच्या बातमीने वारीतील दिंडीवर शोककळा पसरली 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी