शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीजवळ अपघात; आईसह दोन मुली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:13 IST

निपाणी : चालकाचा ताबा सुटून कार झाडावर आदळून उलटली. या भीषण अपघातात दोन मुलींसह माता ठार, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे पुणे-बंगलोर महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटाच्या पायथ्याशी झाला. अपघातातील मृत व जखमी मुंबई येथील आहेत. गोवा येथे नववर्षाचे स्वागत करून मुंबईला परतताना गुप्ता कुटुंबावर काळाने ...

निपाणी : चालकाचा ताबा सुटून कार झाडावर आदळून उलटली. या भीषण अपघातात दोन मुलींसह माता ठार, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे पुणे-बंगलोर महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटाच्या पायथ्याशी झाला. अपघातातील मृत व जखमी मुंबई येथील आहेत. गोवा येथे नववर्षाचे स्वागत करून मुंबईला परतताना गुप्ता कुटुंबावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.सावित्री गुलाबचंद गुप्ता (वय ४१), शोभा गुलाबचंद गुप्ता (२५), आरती गुलाबचंद गुप्ता (२१) या तिघी या अपघातात ठार झाल्या आहेत, तर नीलेश गुलाबचंद गुप्ता (४१), रवी मोहनलाल गुप्ता (२९) आणि चालक सूर्या साई (२२) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत.मुंबई येथील गुप्ता कुटुंबीय नवीन वर्षाचे स्वागत आणि पर्यटनाच्या निमित्ताने स्विफ्ट कारने गोव्याला गेले होते. सोमवारी (दि. १) ते मुंबईला परत जाण्यासाठी गोव्याहून निघाले. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास तवंदी घाटाच्या पायथ्याशी असणाºया चव्हाण मळ्याजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे महामार्ग आणि सेवा रस्त्याच्या मधल्या पट्ट्यातील झाडांवर कार वेगाने आदळली आणि तीन ते चारवेळा उलटली. या अपघातात सावित्री, शोभा व आरती या जागीच ठार झाल्या. तर नीलेश गुप्ता, रवी गुप्ता आणि सूर्या साई हे तिघे गंभीर जखमी झाले.अपघातस्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रवींद्र गडादी, डीवायएसपी अंगडी, सीपीआय किशोर भरणी यांनी पाहणी केली. फौजदार शशिकांत वर्मा, सहायक फौजदार डी. बी. कोतवाल यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी पंचनामा केला.घटनास्थळी दृश्य हृदयद्रावककार उलटत असतानाच गाडीतून काहीजण बाहेर फेकले गेले, तर काहीजण गाडीत अडकून पडले होते. कारचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते.महामार्गावरून जाणाºया प्रवाशांनीच जखमींना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर जखमींना कोल्हापूर येथे हलविण्यात आले. अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पुंज लॉईडच्या कर्मचाºयांनी आणि महामार्ग पोलिसांनी सुरळीत केली.