शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईन योजनेच्या कामास गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 11:35 IST

muncipaltycarporation, kolhapurnews, water कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेतील प्रलंबित कामांचा कालबद्ध प्राधान्यक्रम ठरवून तत्काळ योजनेच्या कामाला गती द्या, अशा स्पष्ट सूचना महपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ठळक मुद्देथेट पाईपलाईन योजनेच्या कामास गती द्या प्रशासक बलकवडे यांचे आदेश : योजनेच्या कामाची केली पाहणी

कोल्हापूर : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट पाईपलाईन योजनेतील प्रलंबित कामांचा कालबद्ध प्राधान्यक्रम ठरवून तत्काळ योजनेच्या कामाला गती द्या, अशा स्पष्ट सूचना महपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.डॉ. बलकवडे यांनी बुधवारी काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरास थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी काळम्मावाडी येथील जॅकवेल, राजापूर व नरतवडे येथील पाईपलाईन आणि पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रकल्प अधिकारी हर्षजित घाटगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

योजना तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन्यजीव व वन विभाग व महावितरण विभाग यांच्याशी योग्य समन्वय ठेवून प्रकल्पाची कामे प्राधान्याने व्हावीत, यासाठी समयबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याची सूचना बलकवडे यांनी दिली.बलकवडे यांनी सुरुवातीस राधानगरी तालुक्यातील राजापूर येथील जॅकवेलच्या कामाचा आणि १८०० मिलिमीटर व्यासाच्या गुरुत्त्ववाहिनी पाईपलाईनच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. धरणक्षेत्रातील इन्स्पेक्शन वेल, इंटेक वेल, कनेक्टिंग पाईप, जॅकवेल, इत्यादी कामे पूर्ण करण्याच्या कालावधीबाबत नियोजित वेळेचा बार चार्ट तयार करण्याची सूचनाही प्रकल्प अधिकारी यांना केली. तसेच वन विभागाशी संबंधित गट नंबर ५१ व गट नंबर १७४ मधील प्रलंबित कामांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.यावेळी उपजल अभियंता रामचंद्र गायकवाड, शाखा अभियंता संजय नागरगोजे तसेच योजनेचे तांत्रिक सल्लागार युनिटी कन्सल्टंट, पुणे यांचे प्रतिनिधी विजय मोहिते, आर. बी. पाटील आणि ठेकेदार जी.के.सी. प्रोजेक्टस लि.चे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी हे उपस्थित होते. 

टॅग्स :water transportजलवाहतूकMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर