शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

निकालातील गोंधळाविरोधात अभाविपची शिवाजी विद्यापीठात निदर्शने, परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची मागणी

By संदीप आडनाईक | Updated: April 10, 2023 17:04 IST

हिवाळी सत्रातील काही परीक्षांचे निकाल परीक्षा विभागाने लावले आहेत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वर्ष २०२२-२३ च्या सत्र परीक्षांच्या निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याच्या निषेधार्थ नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. परीक्षेतील निकालाच्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्या परीक्षा नियंत्रकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. स्वत: कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले.शिवाजी विद्यापीठातील हिवाळी सत्रातील परीक्षा सुरु आहेत. यातील काही परीक्षांचे निकाल परीक्षा विभागाने लावले आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे गुण प्राप्त करूनही अनुत्तीर्ण दाखवले गेले आहेत, काही विद्यार्थ्यांच्या गुणांच्या जागी स्टार, प्रश्नचिन्ह, हॅशटॅग सारखी चिन्हे दाखवली गेली आहेत, पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करूनही काही विद्यार्थ्यांची पात्रता पूर्ण नाही असे दाखवले गेले आहे, अशा समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. याप्रकरणी अभाविपने प्रशासनास ५ एप्रिल रोजी निवेदन दिले होते. कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांसह अभाविपने विद्यापीठात आंदोलन केले. प्रशासन जोपर्यंत समर्पक उत्तर विद्यार्थ्यांना देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशारा देऊन गोंधळाला जबाबदार असणाऱ्या परीक्षा नियंत्रकांनी राजीनामा देण्याची मागणी अभाविपने केली आहे.विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. तेव्हा प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि परीक्षा नियंत्रक मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंग जाधव आंदोलनस्थळी आले. त्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. सुधारित निकाल सात दिवसांमध्ये लागले नाहीत, तर परीक्षा नियंत्रक जाधव यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.या आंदोलनात अभाविपचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांच्यासह सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दिनेश हुमनाबादे, प्रसाद लष्कर, स्वप्निल पाटील, पंकज जत्ते, शिवतेज शेटे, श्रीनाथ साळुंखे आदी कार्यकर्ते आणि विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ