शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

अभिषेक, ननवरे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते  गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 16:14 IST

उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठाचा ५६ व्या दीक्षान्त समारंभात पार पडला. त्यामध्ये यंदा सर्वाधिक ६० हजार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.  राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते.

ठळक मुद्देअभिषेक, ननवरे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षान्त समारंभ

कोल्हापूर :उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठाचा ५६ व्या दीक्षान्त समारंभात पार पडला. त्यामध्ये यंदा सर्वाधिक ६० हजार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.  राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते.

त्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या सन २०१९-२०२० चे राष्ट्रपती सुवर्णपदक कोल्हापूरच्या अभिषेक दादासाहेब श्रीराम याला आणि एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल कुलपती पदक हे सातारा येथील कीर्ती दत्तात्रय ननवरे हिला प्रदान करण्यात आले.

तथाकथित विकासाच्या गदारोळात मोठ्या मोठ्या शहरांनी आपली ओळख हरविली आहे. मात्र, कोल्हापूरकरांनी आपल्या शहराची ओळख कायम राखली आहे. खरा भारत हा खेड्या आणि कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये वसला आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी गुरूवारी येथे केले.  विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

डॉ. पटवर्धन म्हणाले, मॅकॉलिझमची ‘कुलगुरू’ नव्हे, तर गुरूकुल व्यवस्थेकडे पुन्हा जाण्याची, सध्याच्या शैक्षणिक प्रणालीच्या पुर्नविचाराची आवश्यकता आहे. महात्मा गांधी यांच्या ‘बुनियादी शिक्षण’ प्रणाली घेऊन भविष्यातील शिक्षण दिले पाहिजे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आई, मातृभाषा, भारतमाता आणि प्रकृतीमाता (पर्यावरण) यांचा प्रत्येकाने आदर राखावा. विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी जिद्द, कष्टाने कार्यरत रहावे. प्रारंभी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे, अर्थतज्ञ जे. एफ. पाटील, बी. पी. साबळे, डॉ. शर्मा, आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तृप्ती करेकट्टी, नंदिनी पाटील, सुस्मिता खुराळे, श्रद्धा निर्मळे, धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर