शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेतून व्यापाऱ्यांना कोटीचा दिलासा

By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST

‘एलबीटी’ प्रश्न : चार वर्षांतील दंड, व्याज माफ; दोन महिन्यांत तिजोरीत साडेबारा कोटी

गणेश शिंदे - कोल्हापूर --स्थानिक संस्था कर अर्थात ‘एलबीटी’ या करासाठीच्या ‘अभय’ योजनेमधून (अ‍ॅम्नेस्टी स्कीम) कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांचे गेल्या चार वर्षांतील सुमारे शंभर कोटी रुपये वाचल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. तर ही रक्कम सत्तर कोटी रुपयांच्या घरात जाते असे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत राज्य शासनाने मुंबई वगळता सर्व महापालिका प्रशासनांना हा आदेश पाठविला आहे. या अभय योजनेमुळे १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१५ या चार वर्षांच्या कालावधीतील कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील व्यापाऱ्यांचे दंड आणि व्याज माफ होणार आहे. दरम्यान, १ एप्रिल ते ३१ मे २०१५ अखेर या दोन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत एलबीटीमधून सुमारे साडेबारा कोटी रुपये जमा झाले.कोल्हापूर महापालिकेने १ एप्रिल २०११ रोजी एलबीटी या कराची अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या वर्षी या कराला शहरातील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. व्यापाऱ्यांनी सुमारे ६० कोटी रुपये एलबीटी भरलाच नाही. त्यामुळे एलबीटीमधून ६० कोटी (१ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ पर्यंत) रुपयांचे उत्पन्न मिळाले. यानंतर एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांचा लढा दिवसेंदिवस वाढत गेला आणि कोल्हापुरात सुरू झालेल्या आंदोलनाचा उद्रेक इतरत्र महापालिका क्षेत्रांमध्ये झाला.याचाच परिपाक म्हणून तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारविरोधात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व्यापाऱ्यांनी मतदान केले. त्याचे रूपांतर राज्यातील सत्तांतरात झाले. अशी होतेय दंड, व्याजाची आकारणीसध्या महापालिकेकडे शहरातील सुमारे १२ हजार एलबीटीधारक व्यापाऱ्यांची नोंदणी आहे. त्यांपैकी बहुतांश व्यापाऱ्यांनी एलबीटी न भरल्यामुळे त्यांना दंड आणि व्याजाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर व्याजावर व्याज म्हणून चक्रवाढ व्याज लावले जाते. त्यामुळे व्याजाची रक्कम वाढली. महापालिका प्रशासन एलबीटीवर व्यापाऱ्यांकडून महिन्याला दोन टक्के असे मिळून वार्षिक २४ टक्के व्याज घेते; तर पाच ते दहा हजार रुपयांवर दंडाची आकारणी करते.शुक्रवारी मार्गदर्शन मेळावाशहरातील व्यापाऱ्यांना अभय योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शुक्रवारी मेळावा दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. या मेळाव्यात अभय योजनेबाबतची सखोल माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे.राज्य शासनाने अभय योजनेबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. व्यापाऱ्यांच्या लढ्यामुळे हे शक्य झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली. या निर्णयामध्ये युतीचा फार मोठा वाटा आहे.- सदानंद कोरगांवकर, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा उद्योजक वव्यापारी महासंघ.काही व्यापारी नियमित एलबीटी भरतात; पण काही व्यापारी एलबीटी भरत नाहीत. जे व्यापारी एलबीटी भरण्यास टाळाटाळ करतात अशांना दंड आणि व्याज लावले जाते. पण, आता राज्य शासनाने अभय योजना लागू केली आहे. याचा व्यापाऱ्यांना फायदा होईल.- दिलीप कोळी, एलबीटी अधिकारी, कोल्हापूर महापालिका.