शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

आजरा साखर कारखाना पदाधिकारी बदलाच्या हालचाली

By admin | Updated: August 6, 2015 21:46 IST

अशोक चराटी अध्यक्षपदाचे दावेदार : अध्यक्ष केसरकर यांच्यासह उपाध्यक्ष घोरपडे राजीनामा देणार

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडून आमदार हसन मुश्रीफ यांनी राजीनामा मागितला असून, आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नूतन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. अध्यक्षपदासाठी श्रीमती अंजना रेडेकर यांचा दावा राहणार असून, संख्याबळाच्या जोरावर अण्णा-भाऊ संस्था समूहाचे अशोक चराटी हेदेखील अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार समजले जातात.आजरा तालुका संघ निवडणुकीपाठोपाठ आजरा साखर कारखान्याच्या पदाधिकारी निवडीच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या चार महिन्यांत आजरा तालुक्यातील राजकीय वातावरण बरेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना पदाधिकारी निवड प्रक्रियेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांवर मे महिन्यात होणाऱ्या कारखाना निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे. कारखान्याची सद्य:स्थिती व आर्थिक आव्हाने पाहता अंजनाताई रेडेकर अथवा अशोक चराटी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी बहुतांशी संचालक करीत आहेत.मुश्रीफ व अशोक चराटी यांच्यातील ताणलेले संबंध पाहता मुश्रीफ, के.पी. पाटील हे सहजासहजी चराटी अथवा त्यांच्या समर्थक संचालकांवर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवतील असे वाटत नाही. प्रसंगी आपल्या समर्थक संचालकांच्या बळावर चराटी बहुमताद्वारे अध्यक्षपदी विराजमान होणे फारसे अवघड वाटत नाही. अंजनातार्इंना अद्याप अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे पूर्वनियोजनानुसार त्यांनाही संधी देण्याची गरज आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांचा राजीनामा घेणे कदाचित मुश्रीफ यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू शकते. राष्ट्रवादीची सत्ता अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा धोका राष्ट्रवादी व आजरा तालुक्यातील राष्ट्रवादीचे सध्याचे कार्यकर्ते कितपत पत्करणार हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. तसेच संख्याबळाचा प्रश्न उपस्थित झालाच, तर तालुका संघ निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आमदार मुश्रीफ यांच्या विरोधी गटातील संचालकांची नेमकी भूमिका (?) काय राहील, यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत.आजरेकर पुन्हा अनुभवणार सत्तासंघर्षपुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रस विरुद्ध इतर सर्वजण असा सत्तासंघर्ष आजरा तालुकावासीयांना अनुभवण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. अशोकअण्णा, अंजनाताई यांना अगदी सहजपणे अध्यक्षपद मिळणार नाही, हे निश्चित.राजीनामा देणार : केसरकरअध्यक्षपदाचा राजीनामा आपल्याकडे मुश्रीफ यांनी मागितला असून, या पदाचा रीतसर राजीनामा आपण देणार आहे, अशी प्रतिक्रिया विद्यमान अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी दिली.