शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आयुष्याची चिंता सतावणाऱ्या विद्यार्थ्याने संपवले जीवन, इंग्रजीत पानभर लिहिली सुसाईड नोट

By संदीप आडनाईक | Updated: February 19, 2024 12:15 IST

फरशी कापण्याच्या ग्राईंंडर मशीनच्या साहाय्याने गळा कापून घेतला

कोल्हापूर : आर्थिक परिस्थितीमुळे भविष्यातील आयुष्याची चिंता सतावणाऱ्या डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या नीरज विकास सरगडे (वय २३) या विद्यार्थ्याने रविवारी दुपारी सुधाकरनगरातील राहत्या फ्लॅटमध्ये फरशी कापण्याच्या ग्राईंंडर मशीनच्या साहाय्याने गळा कापून घेऊन आत्महत्या केली.नीरज सरगडे हा आपल्या आई आणि आजोबासोबत आईच्या माहेरी सुधाकरनगर येथील बागेश्री अपार्टमेंटमध्ये राहात होता. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीमुळे अभियांत्रिकीचे डिप्लोमाचे शिक्षण तो घेत होता. आपल्या भविष्याबद्दल तो सातत्याने चिंता करत होता. शिक्षण पूर्ण होण्यासाठी लागणारी रक्कम, लग्नासाठी लागणारी रक्कम, मुलाबाळांचा खर्च अशा भविष्यातील खर्चाची तरतूद आपण करू शकणार नाही या चिंतेने ग्रासलेल्या नीरजने रविवारी आत्महत्या केली. हा प्रकार रात्री ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. परिसरातील नागरिकांना ग्राईंडर मशीनचा आवाज सातत्याने येत असल्यामुळे त्यांच्या अपार्टमेंटमधील फ्लॅटकडे धाव घेतली असता फ्लॅट बंद आढळला. त्यांनी संपूर्ण अपार्टमेंटची वीज बंद केली. त्यानंतर हाका मारूनही कोणी दार उघडत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मागच्या बाजूने जाऊन फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता नीरज बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

चिठ्ठीत भविष्याची चिंतामृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये नीरजने इंग्रजीत पानभर भविष्याची चिंता व्यक्त करून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. नीरजची आई आपल्या माहेरी नीरजच्या आजोबांजवळ राहात होती. तो एकुलता असून रविवारी त्याची आई कऱ्हाड येथे गेली होती. नीरजने दुपारी कॉलेजला जाऊन आल्यानंतर घरी गेला आणि दार लावून घेऊन आत्महत्या केली.

ग्राईंडर मशीन नव्याने विकत घेतले..नीरजने ग्राईंडर मशीन नव्याने विकत घेतल्याचे आढळून आले. मृतदेहाजवळच त्या मशीनचे कव्हर आढळून आले. मशीनचा आवाज ऐकायला येऊ नये आणि रक्त उडू नये म्हणून नीरजने चेहरा कापडाने घट्ट बांधून घेतला होता. गळा कापून घेतल्यानंतर मशीन कलंडल्याने बाजूला आवाज करत पडले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर