शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून चिमणी केली टॅग; अवघ्या ८१ दिवसांत गाठले कझाकिस्तान!

By संदीप आडनाईक | Updated: March 23, 2024 12:43 IST

संशोधन अहवालातील नोंदी

कोल्हापूर : भारतीय खंडात आढळणाऱ्या तीन उपप्रजातींपैकी ‘स्पॅनिश स्पॅरो’ या प्रजातीच्या एका चिमणीने मुंबई ते कझाकिस्तान प्रवास ८१ दिवसांतच पूर्ण केला आहे. हा सर्वांत कमी कालावधी मानला जातो. काही चिमण्यांनी कझाकिस्तानशिवाय रशिया, नैऋत्य ताजिकिस्तान आणि पाकिस्तानापर्यंतही उड्डाण केलेले आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)ने अलीकडेच सादर केलेल्या एका संशोधन अहवालात या स्थलांतराची माहिती संशोधकांनी नोंदवली आहे. मोबाइल टॉवर्स आणि चिमण्या कमी होण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही आणि त्याबद्दल कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, अशी माहिती सृष्टी कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे उपसंचालक आणि पक्षी अभ्यासक डॉ. गिरीश जठार यांनी दिली.कझाकिस्तानच्या जांभीलपर्यंतचा प्रवास ८१ दिवसांत पूर्ण करणाऱ्या या ‘स्पॅनिश स्पॅरो’ प्रजातीमधील चिमणीला मुंबईत टॅग लावला होता. चिमण्यांच्या स्थलांतराचा सर्वांत जास्त कालावधी ८ वर्षांचा नोंदवलेला आहे. बीएनएचएसने टॅग केलेल्या पाच चिमण्यांपैकी ४ चिमण्या या राजस्थानातील भरतपूर येथे तर एका चिमणीला मुंबईत रिंग केले होते. भरतपूर येथे रिंग केलेली एका चिमणी अग्नेय कझाकिस्तानातील अलमटी येथे तर कझाकिस्तानच्या जांभील येथे रिंग केलेली एक चिमणी पुन्हा भरतपूर येथे परतल्याची नोंद झाली आहे. भरतपूरची एक चिमणी आठ वर्षांनी पाकिस्तानच्या हझ्रो जिल्ह्यात आढळली.हाऊस स्पॅरोच्या आठ चिमण्यांच्या नोंदीहाऊस स्पॅरो उपप्रजातीच्या आठ चिमण्यांच्या नोंदी संशोधकांनी नोंदवल्या आहेत. भरतपूर येथे रिंग केलेली ही चिमणी रशिया, कझाकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये आढळली. नैऋत्य कझाकिस्तानमध्ये तीन आणि उत्तर कझाकिस्तानमध्ये एका चिमणीची नोंद झाली आहे. कझाकिस्तानातील तीन चिमण्यांपैकी एक दिल्लीत आणि तामिळनाडूच्या पॉईंट कॅलिमर वन्यजीव अभयारण्यात रिंग केलेली एक चिमणी बांगलादेशात आढळली. या प्रजातींतील चिमणीने सर्वांत कमी म्हणजे ९९ दिवसांत तर एकीने ३ वर्षांत स्थलांतर केल्याची नोंद आहे.डॉ. जठार म्हणतात, वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्या शहरात कमी असल्या तरी त्या पूर्ण हद्दपार झालेल्या नाहीत. चिमण्यांच्या पिलांना कीटक जे अन्न मिळवून देतात ते घरामागील अंगण आणि शहरांतील बागांमध्ये आता उपलब्ध होत नाही. चिमण्यांना माती आणि छतावरील कौले असलेल्या घरांमध्ये प्रजननासाठी जागा मिळते, जी फक्त गावांमध्ये उपलब्ध आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई