शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गगनबावड्यात आढळला दुर्मीळ ‘मॉण्टेनचा तस्कर’ साप, आर. आर. आबांच्या भाच्याने लावला शोध

By संदीप आडनाईक | Updated: August 4, 2023 12:33 IST

डॉ. अमित पाटील हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे भाचे 

कोल्हापूर : गगनबावडा परिसरात ‘मॉण्टेनचा तस्कर’ हा अतिशय दुर्मीळ सहज न आढळणारा साप आढळला आहे. गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील यांनी या सापाचा शोध लावला आहे.गगनबावडा परिसरात दि. २ ऑगस्ट रोजी डॉ. अमित यांना सकाळी साडेअकरा-बाराच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातच हा दुर्मीळ प्रजातीचा पूर्णवाढ झालेला तस्कर साप आढळला. तो ४-४.५ फूट लांबीचा आणि १-१.२५ इंच जाडीचा आहे. सामान्य तस्कर सापापेक्षा याचा रंग जास्त गडद आणि डोक्यावरील पट्टे वेगळे असल्याने त्यांनी इंटरनेवरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही समजू शकले नाही. दरम्यान, राधानगरीच्या बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांच्या माध्यमातून सरिसृप अभ्यासक डॉ. वरद गिरी आणि कर्नाटकातील प्राणिशास्त्रज्ञ डॉ. दीपक देशपांडे यांच्याशी त्यांनी फोनवरून संपर्क साधला. डॉ. देशपांडे यांनी त्यांना काही संदर्भ पाठवले. तर डॉ. गिरी यांनी पाठविलेल्या विविध फोटोंच्या आधारे हा ‘सामान्य तस्कर’ साप नसून ‘मॉण्टेनचा तस्कर’ असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. वरद गिरी यांनी डॉ. अमित पाटील यांनी सापांच्या केलेल्या अभ्यासाबद्दल त्यांचे कौतुकही केले.तस्कर हा बिनविषारी साप असून अतिशय उजळ रंगाचा असून देखणा असतो. सुमारे ४.५-५ फूट वाढणारा हा साप धोक्याची जाणीव होताच हल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण पवित्रा घेतो. शक्यतो दाट जंगलात वाळवीच्या बिळांमध्ये राहतो आणि उंदीर, सरडे, पाली, लहान पक्षी हे त्याचे खाद्य आहे.गगनबावडा परिसरातील सापांच्या ठेवल्यात नोंदीडॉ. अमित पाटील हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे भाचे आहेत. त्यांनी गगनबावडा परिसरात मलबार पिट वायपर, बांबू पिट वायपर, बेडॉम्स कॅट स्नेक, फ्रॉर्स्टेन्स कॅट स्नेक, वोल्फ स्नेक, हिरवा नाग म्हणून ओळखला जाणारा ग्रीन किलबॅक, चेकर्ड किलबॅक, बफ स्ट्राइप्ड किलबॅक, खापरखवल्या, नाग, मण्यार, घोणस, फुरसे, धामण अशा बऱ्याच प्रजातींच्या सापांच्या नोंदी ठेवल्या आहेत.

या मॉण्टेन प्रजातीच्या सापांमध्ये डोक्यावरील आणि अंगावरील पट्ट्यांनुसार सहा प्रकार आढळतात. नव्याने आढळलेला हा साप तिसऱ्या उपप्रकारातील आहे. -डॉ. वरद गिरी, सरिसृपतज्ज्ञ. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsnakeसाप