शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्राधिकरण झाले, मग हद्दवाढीचा विषय कशासाठी?; हद्दवाढ विरोधी कृती समितीचे उपोषण

By संदीप आडनाईक | Updated: October 16, 2023 18:30 IST

जिल्ह्याचा प्राधिकरणाद्वारेच विकास होऊ शकतो

कोल्हापूर : प्राधिकरण झाले, मग हद्दवाढीचा विषय कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावामधील सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी कोल्हापुरात एकदिवसीय उपोषण केले. हा विषय पुन्हा काढल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला आहे. यासंदर्भात सोमवारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण प्राधिकरण १६ ऑगस्ट २०१७ मध्ये नगररचना कायदा कलम ४२ प्रमाणे स्थापन केले आणि हद्दवाढ हा विषय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मध्यस्थीने व हद्दवाढ विरोधी समिती तसेच हद्दवाढ समर्थक समिती यांच्याशी संयुक्त चर्चा करून निकाली काढला, असे असताना पुन्हा हा विषय उकरून काढला जात आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी  माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे अध्यक्ष भगवान काटे, निमंत्रक राजू माने, उपाध्यक्ष मधुकर जांभळे, सचिव बी. ए. पाटील, प्रवक्ते नारायण पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर हे उपोषण करण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या या आंदोलनात हद्दवाढीविरोधी गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हद्दवाढीला विरोध केला.शहराचे महसूल क्षेत्र व संपूर्ण जिल्ह्याच्या महसूल क्षेत्राचा व लोकसंख्येचा आधार घेऊन प्राधिकरणाच्या परिपत्रकाप्रमाणे बदल करावा,  जिल्ह्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी  उद्योग निर्मिती आवश्यक आहे, इचलकरंजी व कोल्हापूर महापालिका, तसेच जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींची संख्या पाहता उद्योग, शेती, पर्यटन विकासाच्यादृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याचा  प्राधिकरणाद्वारेच विकास होऊ शकतो. त्यामुळे हद्दवाढीचा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढून जनतेमध्ये संभ्रम पसरवणे थांबवावे अशी मागणी समितीने केली आहे. या आंदोलनात महेश चव्हाण, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळोखे, तानाजी पालकर, संग्राम जाधव, विश्वजीत बगाडे, पृथ्वीराज पाटील, दिलीप पुजारी, प्रकाश सुर्यवंशी, बाळासाहेब साळोखे, कावजी कदम, रवींद्र चौगुले यांनी भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर