शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

तामिळनाडूत शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीला चित्रकार वॅन गॉग यांचे नाव

By संदीप आडनाईक | Published: March 28, 2024 1:48 PM

गोल बुब्बुळाच्या दोन नव्या प्रजाती : अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, अगरवाल यांचे संशोधन

कोल्हापूर : तामिळनाडू राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरुन पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आलेले आहे. या संशोधनामधे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांचा सहभाग सहभाग आहे. यातील एका प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरुन केलेले आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सध्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींचे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान प्रथमतः आढळून आलेल्या आणि नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आलेला आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलची रचना आणि जनुकीय संचाच्या वेगळेपणावरुन दोन्ही पाली कुळातील इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळ्या ठरतात. ऑकलँड (न्यूझीलंड) येथील ‘झूटॅक्सा’ या शोधपत्रिकेमध्ये बुधवारी हा संशोधन प्रबंध प्रकाशित झाला आहे.नव्याने शोधलेली 'निमास्पिस व्हॅनगॉगी' ही प्रजात तामिळनाडू राज्यातील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामधे आढळली. प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांचे नाव दिलेल्या नावावरुन पालीच्या अंगावरील रंगसंगती वॅन गॉग यांच्या ' द स्टारी नाईट' या चित्राशी मिळतीजुळती आहे. 'निमास्पिस सथुरागिरीएन्सिस' ही प्रजात तामिळनाडूच्या विरुदुनगर जिल्ह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळली. तिच्या आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण निमास्पिस सथुरागिरीएन्सिस असे केले आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सध्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींचे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान प्रथमतः आढळून आलेल्या आणि नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आलेला आहे. नव्याने शोध लागलेल्या या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. -अक्षय खांडेकर, संशोधक, ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन