शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पन्नास हजार मोजा, ‘कुणी’बी दाखला काढा; आपले सरकार केंद्रचालक रॅकेटचे सूत्रधार

By भीमगोंड देसाई | Updated: September 8, 2023 08:04 IST

या रॅकेटचे सूत्रधार आणि पैसे मागणारे बहुतांशी ‘आपले सरकार केंद्रचालक’ आहेत.

- भीमगोंडा देसाई कोल्हापूर : किमान पन्नास हजार मोजा आणि कुणबी दाखला काढा, मागेल तितके पैसे देणार नसाल तर पूर्वीच्या कागदपत्रांतील ‘कु’चे कुळवाडी म्हणजे मराठा आहे म्हणून तुम्हाला दाखला मिळणार नाही, असे स्पष्ट उत्तर मिळते. पैसे मोजण्याची तयारी असेल तर ‘कु’चे कुणबी होते. दाखला सहजपणे मिळून जातो, असे रॅकेट कुणबी जातीचा दाखला देण्यासाठी तयार झाले आहे. 

या रॅकेटचे सूत्रधार आणि पैसे मागणारे बहुतांशी ‘आपले सरकार केंद्रचालक’ आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आल्यानंतर कागदपत्रे पाहून दर सांगतात. सांगेल तितके पैसे दिले तर दाखल्यासाठीची पुढील कार्यवाही सुरू होते; अन्यथा त्रुटी काढली जाते. दाखल्यासाठी दिलेल्या खोक्यात तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय वाटेकरी असतात, असा सार्वत्रिक आरोप आहे. त्यामुळे पैसे टाकले की कुणबी दाखला ‘कुणी’बी काढू शकतो, अशी व्यवस्था आहे.  

प्रत्येक टप्प्यावर अशी होते लूट

दाखल्यासाठी मोडी लिपीतील कागदपत्रे काढण्यासाठी मोडी वाचणाऱ्या व्यक्तीची गरज असते. तो तालुक्याच्या रेकॉर्ड रूमपर्यंत येण्यासाठी दोन हजार रुपये घेतो. कागदपत्रे शोधून मिळविण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतात. कागदपत्रे मिळाल्यानंतर सर्कल चौकशीसाठी स्वत: अर्जदारांनीच दोन ज्येष्ठ व्यक्तींना घेऊन जायचे. अहवालासाठी सर्कल पातळीवर कमीतकमी पाच हजार रुपये मोजावे लागतात. तलाठी ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत कुणबी दाखल्यांसाठी खुलेआम लूट केली जाते. 

जास्त पैसे दिले तर कुणबीसाठीचे पुरावेकुणबी किंवा इतर ओबीसीमधील जातीचा दाखला काढण्यासाठी जास्त पैसे मोजले तर कागदोपत्री पुरावे नसले तरी खाडाखोड करून पुरावे तयार केले जातात. यासाठी मात्र लाखांत पैसे मोजण्याची तयारी असावी लागते.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षण