शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: हातात पिशवी असल्याने भटक्या कुत्र्याने पाठलाग केला, चिमुकला गंजीत लपला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:02 IST

मुलगा शाळेत आला नसल्याचे समजताच शोधाशोध सुरु झाली

कोपार्डे : अवघ्या सात-आठ वर्षाचा चिमुकला. हातात पिशवी असल्याने भटक्या श्वानाने त्याचा पाठलाग केला. घाबरून तो जवळच असलेल्या पिंजराच्या गंजीत लपून बसला. पण, मुलगा शाळेत आलेला नाही, असे पालकांना समजले आणि न हरवलेल्या मुलाची बातमी ऐकून सारे गाव हादरले. शेवटी चार-पाच तासांनी श्वानापासून सुरक्षित असल्याचे पाहून तो बाहेर आला आणि या नाट्यावर पडदा पडला. ही घटना मंगळवारी शिंदेवाडी (ता. करवी) येथे घडली. रणवीर प्रकाश पाटील असे या मुलाचे नाव आहे.रणवीर हा घरातून शाळेला निघाला. पण, भटक्या श्वानांनी त्याच्या हातातील पिशवी पाहून झडप घातली. प्रथम त्याच्या पायाला श्वानाने चावा घेतला. पण, मुलाने हिमतीने हल्ल्यातून सुटका करून घेत जवळच असलेल्या पिंजराच्या गंजीत लपून बसला. श्वान या गंजीजवळच घुटमळत राहिल्याचे पाहून रणवीर तसाच गंजीत लपून बसला.रणवीर शाळेत पोहचला नसल्याचे घरी समजल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. सोशल मीडियावर रणवीरचा फोटो व खाली तो हरवल्याची पोस्ट व आढळल्यास खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले. आई, वडील व नातेवाइक कासावीस झाले. सर्वांनी पै-पाहुण्यांशी संपर्क केला. मोटरसायकल घेऊन परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला.गंजीभोवती घुटमळणारे श्वान निघून गेल्यानंतर रणवीर हळूच गंजीतून बाहेर आला. तो गावातीलच एक महिलेला दिसला. तिने रणवीरला घरी सुरक्षित पोहच केले. जिवावर आले ते पायावर निभावले. श्वानाच्या रुपाने काळ आला होता. पण, वेळ आली नव्हती, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Dog chases boy, he hides in haystack, rescued!

Web Summary : A seven-year-old boy, chased by a dog, hid in a haystack in Shindewadi. Missing reports triggered a village-wide search. After four hours, the dog left, and the boy was safely rescued by a local woman.