शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: १५ लाख द्या, थेट मंत्रालयातून नियुक्तीपत्र घ्या, महापालिकेत भरतीआधीच गंडवणारी टोळी सक्रिय

By भीमगोंड देसाई | Updated: July 20, 2023 13:56 IST

आमदारांच्या पत्राचीही मागणी

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : येथील महापालिकेचा नवीन आकृतीबंध शासनाने मंजूर करून भरतीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच बेरोजगारांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका पदासाठी पंधरा लाखांचा दर काढला आहे. रोख पैशांसह स्थानिक आमदाराचे पत्र आणून दिल्यानंतर मंत्रालयातून नियुक्तीचे पत्र दिले जाईल, असे आमिष दाखवले जात आहे. याचा मुख्य सूत्रधार मिरज येथे असल्याचे सांगितले जाते. मात्र महापालिकेतील नोकर भरती सरळसेवा, पदोन्नतीने होणार आहे. यामुळे कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.महापालिकेत ५ हजार ४४ पदे मंजूर आहेत. यातील २ हजार ५५ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांची संख्या प्रत्येक महिन्याला वाढत आहे. रिक्त जागा आणि नव्याने निर्माण होणारी ४२७ पदांची मेघाभरती होणार आहे. याचा महापालिकेने तयार केलेला नवीन आकृतीबंध मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. शासकीय पातळीवर मंजुरीविना प्रलंबित आहे.दरम्यान, अजून रिक्त जागा आणि नव्याने निर्माण होणाऱ्या जागा किती आहेत, कोणत्या विभागात किती जणांची नियुक्ती होणार हे स्पष्ट नाही. तरीही कोल्हापूर महापालिकेत नोकरीसाठी पंधरा लाख रुपये मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. चांगली ओळख असेल तर पाच लाखात काम करतो. पहिल्यांदा दोन लाख रुपये द्यायचे आणि काम झाल्यानंतर तीन लाख द्यायचे, पैसे रोखच द्यायचे, त्यासोबत स्थानिक आमदाराचे पत्र आणायचे, अशी अट फसवणूक करणाऱ्यांकडून घातली जात आहे. अशाप्रकारे कोणालाही यापूर्वी नोकरी मिळालेली नाही. यामुळे फसवणूक करण्यासाठी असे तंत्र वापरले जात आहे.

सरळसेवेनुसार नोकरी

महापालिकेत नोकरी कोणीतरी सांगितले, वशिला लावल्यानंतर मिळेल अशी सध्याची व्यवस्था नाही. सरळसेवा आणि बढतीने जागा भरण्यात येतात. याची संपूर्ण प्रक्रिया मंत्रालय पातळीवरून चालते. यामुळे नोकरीसाठी कोणालाही पैसे द्यायची आवश्यकता नाही. सरळसेवेत पात्रता आणि गुणवत्तेनुसारच नोकर भरती होणार आहे. यामुळे बेरोजगार तरुणांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, नोकरीसाठी कोणालाही पैसे देऊ नये, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

महापालिकेचा नवीन आकृतीबंध शासनाकडे पाठवला आहे. तो अजून मंजूर झालेला नाही. कोणत्याही पदाची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. बेरोजगारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. - रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी