शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

बाजार समितीसाठी ९०% मतदान

By admin | Updated: July 13, 2015 00:45 IST

उद्या मतमोजणी : पी. जी. शिंदे गटाचा मतदानावर बहिष्कार

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत व ईर्र्षेने ८९.६० टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान हमाल-तोलाईदार गटात ९४.५१ टक्के झाले. गगनबावडा तालुक्यात पी. जी. शिंदे गटाने मतदानावर बहिष्कार टाकल्याने विकास संस्था गटात अवघे ५२.३५ टक्के मतदान झाले. मतमोजणी उद्या, मंगळवारी शासकीय धान्य गोदामात होणार आहे. बाजार समितीसाठी ६२ केंद्रांवर मतदान झाले. सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. तिरंगी लढतीत नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली होती. वालावलकर हायस्कूल, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथे सकाळी अकरापर्यंत सरासरी २० टक्के मतदान झाले होते. कागल, निढोरी येथे दुपारी साडेबारापर्यंत ५५ टक्के मतदान झाले होते. गारगोटी व राधानगरी येथे दुपारी अडीचपर्यंत सरासरी ७८ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत मतदानासाठी गर्दी झाली होती. हमाल-तोलाईदार गटात ईर्षेने ८९३ पैकी ८४४ मतदान झाले. येथे एका जागेसाठी आठजण रिंगणात असून अपक्षांनीही तगडे आव्हान दिल्याने चुरशीचा सामना होत आहे. गगनबावडा तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते पी. जी. शिंदे यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तालुक्यात विकास संस्था गटाचे ८०६ मतदान आहे. त्यापैकी केवळ ४२२ (५२.३५ टक्के) मतदान झाले. ग्रामपंचायत गटातील २०९ पैकी १५२ (७२.७२ टक्के) मतदान झाले. एकंदरीत, कोल्हापुरातील अडते-व्यापारी केंद्रावर बाचाबाचीचे प्रकार वगळता इतरत्र मतदान शांततेत पार पडले. (प्रतिनिधी)अशी होणार मतमोजणीशासकीय धान्य गोदामात उद्या, मंगळवारी सकाळी आठपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. एकूण २८ टेबलांवर मोजणी केली जाणार असून, पहिल्यांदा विकास संस्था गटातील २८ केंद्रांची एकदम मोजणी होणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत गटाची मोजणी पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार, पणन प्रक्रिया संस्था या क्रमाने मोजणी केली जाणार आहे. यासाठी शंभर कर्मचारी नियुक्त केले असून साधारणत: दुपारी चारपर्यंत मोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग यांनी दिली. पडळ केंद्रावर १०० टक्के मतदान !पडळ केंद्रावर १३ ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान झाले. येथे सर्वच्या सर्व १११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.