शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

शिक्षक बँकेसाठी ९७.३९ टक्के मतदान

By admin | Updated: April 4, 2015 00:28 IST

आज फैसला : बँकेच्या इतिहासात सर्वाधिक मतदान; उच्चांकी मतदान शिरोळ व कागल तालुक्यांत

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी चुरशीने ९७.३८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान शिरोळ व कागल तालुक्यांत ९८.९६ टक्के झाले असून, मतमोजणी शनिवारी (दि. ४) होत आहे. साधारणत: दुपारी चारपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे. बॅँकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे. शिक्षक बँकेसाठी राजाराम वरूटे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ शिक्षक संघ पॅनेल, प्रसाद पाटील व कृष्णात कारंडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल व एस. व्ही. पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेल अशी निकराची व प्रतिष्ठेची तिरंगी लढत झाली. गेले आठ-दहा दिवस प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांनी सारे शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले. शुक्रवारी बारा तालुक्यांतील वीस केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदानासाठी कमालीचा उत्साह जाणवत होता. तिन्ही पॅनेलनी तालुकानिहाय मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्याची सोय केली होती. पाच-सहा गावांतील शिक्षकांना एकत्रित करून तेथून मतदान केंद्रांवर आणले जात होते, तर काही मतदारांनी स्वत:च्या गाडीतून येऊन मतदान करणे पसंत केले. सर्वाधिक १०४८ मतदान असलेल्या करवीर तालुक्याचे मतदान वि. स. खांडेकर विद्यालयात झाले. येथे तीन केंद्रांत १२ बुथ मतदानासाठी तयार केल्याने गतीने मतदान झाले. सकाळपासून एकदाही मतदान केंद्राबाहेर रांग पाहावयास मिळाली नाही. दुपारी एक वाजता पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक ८८ टक्के मतदान तर जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाचपर्यंत ६८२२ पैकी ६६४४ मतदान (९७.३९ टक्के) झाले. दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजता रमणमळा येथील शासकीय गोदामात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. २५ टेबल वर मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलवर दोन असे ७५ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर पहिल्यांदा महिला गटातील मतमोजणी सुरू केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शिरापूरकर व प्रदीप मालगावे यांनी दिली. (प्रतिनिधी)कागलला स्थानिक राजकीय संदर्भप्राथमिक शिक्षक बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कागल तालुक्यामध्ये चुरशीच्या वातावरणात शुक्रवारी मतदान झाले. येथील हिंदुराव घाटगे विद्यामंदिर शाळेमध्ये मतदान केंद्र होते. तिन्ही पॅनेलचे समर्थक मोठ्या संख्येने खर्डेकर चौकात जमा झाले होते. तालुक्यातील ५७३ मतदारांपैकी ५६७ इतक्या मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.शिक्षकांच्या बॅँकेत राजकीय पक्षांचे संदर्भ नसले तरी कागल तालुक्यामध्ये शिक्षकांच्या या आघाड्यांची राजकीय गटानुसार विभागणी झाल्याचे स्पष्ट झाले. मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते भैया माने हे मतदान केंद्राजवळ सत्ताधारी पॅनेलच्या बुथजवळ थांबले होते. त्यानंतर समविचारी पॅनेलच्या समर्थकांनी संजय घाटगे यांच्याशी संपर्क साधला व काही वेळातच अंबरिष घाटगे त्या ठिकाणी आले.विभागणी वेळीच निकाल स्पष्ट सोळा मतपत्रिकांचे विभागीकरण झाल्यानंतर तालुका प्रतिनिधींसह राखीव (महिलावगळता) गटातील चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे.त्यामुळे मतपत्रिकेच्या विभागीकरणानंतर मोजणीचे काम गतीने होणार आहे. शाहूवाडीत गाड्या, नाष्ट्याची व्यवस्था प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या निवडणुकीसाठी शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर केंद्रावर उत्साहात आणि चुरशीने मतदान झाले. ५३७ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९२.९२ टक्के एवढे मतदान झाले. सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्ते मतदानस्थळी रुमाल, टोप्या घालून होते. खास मतदारांना आणण्यासाठी गाड्या व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.५३७ पैकी पाच मृत तर उर्वरित मतदार स्पर्धा परीक्षा, जिल्हा बदलीने बाहेरगावी गेल्याने इतर तालुक्यांपेक्षा कमी मतदान झाले. मतपत्रिकेवर शाई सांडल्यामुळे तणावशिक्षक सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी शिरोळमध्ये ६७९ पैकी ६७२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. मतपत्रिकेवर शाई सांडल्यामुळे उमेदवारांच्यात तणाव निर्माण झाल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली; पण तत्काळ मतपत्रिका उपलब्ध केल्यामुळे पुन्हा मतदानास सुरुवात झाली. शिरोळ तालुक्यातून एकूण ६७९ मतदारांपैकी ६७२ मतदारांनी आपला हक्क बजावला.