शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
3
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
4
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
5
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
6
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
7
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
8
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
9
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
10
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
11
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
12
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
13
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
14
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
15
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
16
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
17
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
18
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
19
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
20
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष

‘हुपरी’साठी चुरशीने ८५ टक्के मतदान,किरकोळ बाचाबाचीचे प्रकार : १०० उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:59 AM

हुपरी : नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या बुधवारी पार पडलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाचाबाचीच्या किरकोळ घटना वगळता

ठळक मुद्देआज दुपारपर्यंत होणार निकाल स्पष्टआघाडीच्या नेत्यांची व उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

हुपरी : नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या बुधवारी पार पडलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाचाबाचीच्या किरकोळ घटना वगळता प्रचंड ईष्येर्ने, पण शांततामय व उत्साही वातावरणात ८५.३७ टक्के मतदान झाले. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेले नगराध्यक्षपद व ९ प्रभागांतील १८ नगरसेवकपदांसाठी नशीब आजमावत असलेल्या १०० उमेदवारांच्या नशिबाचा बुधवारी मतदारांनी मतदानरूपी केलेला फैसला आज, गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होत असल्याने या निकालाकडे रौप्यनगरीवासीयां-बरोबरच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.या निवडणुकीत भाजप, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी, शिवसेना व मनसे प्रणीत अंबाबाई विकास आघाडीच्या नेत्यांची व उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी सात वाजल्यापासून ९ प्रभागांतील ११ ठिकाणी २७ मतदान केंद्रांवर चुरशीने, पण शांततेने मतदान सुरू झाले. शहरात पुरुष मतदार ११२४४ व महिला मतदार १०५२६ असे मिळून २१७७० मतदार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८५.१८ टक्के मतदान झाले. २१७७० मतदारांपैकी ९७३० पुरुष व ८८१३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दुपारी सर्वच नऊ प्रभागांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेबाबतची माहिती जाणून घेतली. नगराध्यक्षपदासाठी जयश्री महावीर गाट (भाजप), सीमा प्रकाश जाधव (कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी), गीतांजली दौलतराव पाटील (मनसे प्रणीत अंबाबाई विकास आघाडी), विमल मुरलीधर जाधव (शिवसेना) व दीपाली बाळासाहेब शिंदे (अपक्ष-राष्ट्रवादी पुरस्कृत) या प्रमुख उमेदवारांत पंचरंगी चुरशीची रंगतदार लढत होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आमदार सुजित मिणचेकर, मनसेचे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.उमेदवारांत वादावादी; अपघातात शेंडुरे जखमीनगरपरिषद कार्यालयासमोरील कन्या विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्राजवळ चारचाकी गाडी घेऊन जाण्याच्या कारणावरून प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपचे उमेदवार आण्णासाहेब शेंडुरे व शिवसेनेचे उमेदवार संभाजी हांडे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची व वादावादी झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य स्मिता शेंडुरे यांचे पती वीरकुमार यांच्या पायावरून चाक गेल्याने ते जखमी झाले. तसेच गाडी पाठीमागे घे, नाहीतर गाडीच फोडतो, असे म्हणत हांडे यांनी दगड हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.