शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा, एनसीसी ‘सी’ परीक्षा रद्द; कोल्हापुरातील ८४० विद्यार्थ्यांना फटका

By संदीप आडनाईक | Updated: February 19, 2024 12:38 IST

कोल्हापूर : यू ट्यूबवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवेमुळे देशभर घेण्यात येणारी एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा रविवारी एनसीसी मुख्यालयाने अचानक स्थगित ...

कोल्हापूर : यू ट्यूबवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवेमुळे देशभर घेण्यात येणारी एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा रविवारी एनसीसी मुख्यालयाने अचानक स्थगित केली. यामुळे कोल्हापूर शहरातील दोन केंद्रांवर ही परीक्षा देणाऱ्या सुमारे ८४० विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. आता ही परीक्षा २५ फेब्रवारी रोजी होणार आहे.राष्ट्रीय छात्र सेनेमार्फत रविवारी संपूर्ण देशभरात एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार होती. हे ‘सी’ प्रमाणपत्र महाविद्यालयांच्या एसडी आणि एसडब्ल्यू विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तसेच ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर देण्यात येते. एनसीसीच्या विद्यार्थ्याने जर ७५ टक्के एनसीसी परेडमध्ये भाग घेतला असल्यास, ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्यास आणि संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात (सीएटीसी) भाग घेतला असल्यास या परीक्षेला बसण्यास पात्र ठरविण्यात येते.दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतली जाते. कोल्हापुरात शाहू कॉलेज आणि गोखले कॉलेजमध्ये रविवारी सकाळी १०:३० ते १ यावेळेत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शाहू कॉलेजमधील ४५० आणि गोखले कॉलेजमधील ३९० विद्यार्थ्यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील पात्र सुमारे ८४० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.अफवा अशीही..कोल्हापुरातील एका कॉलेजच्या केंद्रावर सकाळी १०:३० वाजता पेपर होणार होते. तत्पूर्वीच प्रश्नपत्रिका यू ट्यूबवरून फुटल्याची अफवा पसरल्यामुळे एनसीसी मुख्यालयाकडून ही परीक्षा स्थगित करण्याचा आदेश सकाळी १० वाजता केंद्रप्रमुखांकडे आला. एका कॉलेजमधील एका विद्यार्थ्याकडे ही प्रश्नपत्रिका मिळाल्याची तर प्रश्नपत्रिकेतील १६ ते १७ प्रश्न सिलॅबसबाहेरील छापल्यामुळे परीक्षा स्थगित केल्याची अफवा आहे. संबंधित दोन्ही केंद्रांवर सकाळी १० वाजताच तत्काळ ही प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना मिळाल्याने ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा