शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’ची उच्चांकी ८.२५ कोटींची वसुली

By admin | Updated: November 13, 2016 01:17 IST

वीज बिले भरण्यासाठी झुंबड : उद्या मध्यरात्रीपर्यंत केंद्र सुरू राहणार

कोल्हापूर : केंद्र शासनाचा मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय महावितरण कंपनीच्याही चांगलाच पथ्यावर पडला आहे. महावितरणकडे शुक्रवारी (दि. ११) एका दिवसात सर्व प्रकारच्या बिलांपोटी तब्बल ८ कोटी २४ लाख रुपये रोख जमा झाले. शनिवारीही दिवसभर लोकांची बिले भरण्याची झुंबड होती; परंतु किती रक्कम जमा झाली, हे समजू शकले नाही.राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार महावितरणची सर्व बिले भरणा केंद्र आज, रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत, तर उद्या, सोमवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकृत सूत्रांनी दिली.महावितरणचे कोल्हापुरात परिमंडळ कार्यालय आहे. त्याअंतर्गत घरगुती, औद्योगिक, वाणिज्य व कृषी अशा चारही प्रकारचे कोल्हापूर जिल्ह्णात १० लाख, तर सांगली जिल्ह्यात आठ लाख ग्राहक आहेत. त्यातील अनेक ग्राहक आॅनलाईन बिले भरतात; परंतु त्यांचा या रकमेत हिशेब नाही. महावितरणकडे एका दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दोन कोटी रुपये बिलापोटी जमा होतात. त्याच्या तिप्पट रक्कम प्रत्यक्षात शुक्रवारी जमा झाली. सांगलीत ८० लाख रुपये जमा होतात. हा आकडा सव्वादोन कोटींवर पोहोचला आहे. वीजबिल वसुलीसाठी कित्येक मोहिमा राबविल्या तरी आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि तीदेखील एकाच दिवसात एवढ्या मोठ्या रकमेची कधीच वसुली झालेली नाही. त्यामुळे या निर्णयाचा सामान्य जनतेला रांगेत उभे राहून त्रास होत असला तरी शासकीय-निमशासकीय यंत्रणांना मात्र चांगलाच फायदा होऊ लागला आहे. ही वसुली अशीच झाली तर पुढच्या दोन दिवसांत या परिमंडळात महावितरणचे कोणी थकबाकीदारच राहणार नाहीत.