शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी राज्यात ८२ वसतिगृहे,वीस वर्षांच्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:43 IST

Sugar factory Child Hostel Kolhapur : राज्यातील ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांच्या मुलां, मुलीसाठी राज्यभरातील ४१ तालुक्यांत ८२ वसतिगृहे उभारली जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांत २० वसतिगृहे उभी राहणार आहेत. बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाने ऊसतोडणी कामगार संघटनेच्या २० वर्षांच्या मागणीला व संघर्षाला यश आले आहे.

ठळक मुद्देऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी राज्यात ८२ वसतिगृहेवीस वर्षांच्या लढ्याला यश

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांच्या मुलां, मुलीसाठी राज्यभरातील ४१ तालुक्यांत ८२ वसतिगृहे उभारली जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांत २० वसतिगृहे उभी राहणार आहेत. बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाने ऊसतोडणी कामगार संघटनेच्या २० वर्षांच्या मागणीला व संघर्षाला यश आले आहे.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळातंर्गत सामाजिक न्याय विभागाकडून संत भगवानबाबा वसतिगृह योजना या नावाने ही वसतिगृहे उभारली जाणार आहेत. ऊसतोडणीच्या निमित्ताने तीन ते चार महिने मजुरांना स्थलांतर करावे लागत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा व सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होता. त्यांची शिक्षणावरून आबाळ होत असल्याने राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेने महामंडळाच्या स्थापनेबरोबरच मुलांसाठी सुसज्ज वसतिगृहे उभारावीत, अशी मागणी सातत्याने केली जात होती.कल्याणकारी महामंडळास ऊस खरेदीवर अधिभार आणि तेवढीच रक्कम महाराष्ट्र सरकारने द्यायची, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंदाजपत्रकाही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणकारी महामंडळाचे अडलेले घोडे आता पुढे सरकण्याची चिन्हे आहेत.सीटूकडून स्वागतसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न अग्रक्रमाने पुढाकार घेऊन धसास लावला म्हणून सीटूप्रणित ऊस तोडणी कामगार संघटनेने अभिनंदन केले आहे. शिवाय कल्याणकारी महामंडळाच्या सर्व तरतुदीही अंमलात आणाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सिटूअंतर्गत महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेने यासाठी तब्बल २० वर्षे सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला मोठे यश आले आहे. आता येथून पुढे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याकडे शासनाने लक्ष द्यावे.-प्रा. सुभाष जाधव,सरचिटणीस, राज्य ऊसतोडणी कामगार संघटना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर