शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळागडावर शनिवारी ३६ वा शाहिरी लोककला महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:11 IST

कोल्हापूर : किल्ले पन्हाळागड येथे ३६ वा ‘किल्ले पन्हाळा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय शाहिरी, भेदिक शाहिरी आणि विविध लोककला महोत्सव २०२०’चे शनिवारी ...

ठळक मुद्देसुमारे १५० हून अधिक शाहिरांचा समावेशशाहीर, भेदिक, कलगी तुरा, वारकरी दिंडीचा कार्यक्रम

कोल्हापूर : किल्ले पन्हाळागड येथे ३६ वा ‘किल्ले पन्हाळा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय शाहिरी, भेदिक शाहिरी आणि विविध लोककला महोत्सव २०२०’चे शनिवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे.

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद, सुरभि सांस्कृतिक एवं सामाजिक युवा संगठन व जनसुराज्य शक्ती सांस्कृतिक युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात राष्ट्रीय शाहिरी, भेदिक, कलगी तुरा, वारकरी दिंडी हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सुरभि सांस्कृतिक’चे प्रा. आनंद गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.‘गावगाड्याच्या पाऊलखुणा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महोत्सवाचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते व पन्हाळा नगराध्यक्ष रूपाली धडेल यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

यावेळी करणसिंह गायकवाड आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील, मुख्याधिकारी कैलास चव्हाण, ‘सुरभि’चे अध्यक्ष विश्वास पाटील, नगरपरिषदेचे पक्षप्रतोद दिनकर भोपळे, उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले, आशिष पाटील, आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सायंकाळी सुरू होणारा हा महोत्सव रविवारी पहाटेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.महोत्सवात कोल्हापूरसह पुणे, सातारा, सांगली येथील १५० हून अधिक शाहीर, लोककलावंत उपस्थित राहून कला सादर करणार आहेत. महोत्सवात प्रत्येक शाहीर, लोककलावंताला फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे; तर २५ शाहिरांचा ‘पन्हाळाभूषण’ने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेस शाहीर शहाजी माळी, रवींद्र धडेल, शाहीर विजय जाधव, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर