शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

‘जिओ-टॅगिंग’द्वारे कोल्हापूर जिल्ह्यात ‘जलयुक्त’चे ७३ टक्के कामे, पुणे विभागात ५५ टक्के कामे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:07 IST

‘जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षात ‘जिओ-टॅगिंग’ प्रणालीद्वारे पुणे विभागात आतापर्यंत ५५ टक्के कामे झाली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ९० टक्के तर त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये ७३ टक्के काम झाले आहे. कामाच्या पारदर्शकतेसाठी शासनाने ही प्रणाल तयार केली आहे.

ठळक मुद्दे‘जिओ-टॅगिंग’द्वारे पुणे विभागात ५५ टक्के कामे‘जलयुक्त’चे२०१६-१७ मधील चित्र कोल्हापूर जिल्ह्यात ७३ टक्के

प्रवीण देसाई

कोल्हापूर : ‘जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षात ‘जिओ-टॅगिंग’ प्रणालीद्वारे पुणे विभागात आतापर्यंत ५५ टक्के कामे झाली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ९० टक्के तर त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये ७३ टक्के काम झाले आहे. कामाच्या पारदर्शकतेसाठी शासनाने ही प्रणाल तयार केली आहे.‘जलयुक्त शिवार’ योजनेतील कामे पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने ‘जिओ टॅगिंग’ ही प्रणाली तयार केली आहे. या योजनेतील कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी त्या कामाचा फोटो काढणे, त्यानंतर ते सुरु असताना फोटो काढणे, त्यानंतर ते काम पूर्ण झाल्यावर त्याचा फोटो काढणे व हे सर्व फोटो वेळोवेळी संबंधित वेबसाईटवर अपलोड करणे अशा पध्दतीने या प्रणालीचे काम आहे. यामुळे कामे कोणत्या पातळीवर असून त्याची सद्यस्थितीही समजते.

या प्रणालीच्या माध्यमातून पुणे विभागात २०१६-१७ या वर्षात करावयाच्या एकूण ४५,२४४ इतक्या कामांपैकी २४, ८२६ इतकी कामे आतापर्यंत झाली आहेत. हे प्रमाण ५५ टक्के इतके आहेत. मार्च अखेर हे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९० टक्के कामे झाली असून त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा असून ७३ टक्के इतकी कामे झाली आहेत. ‘जलयुक्त’मधील अनघड दगडी बांध, लहान मातीचे बांध, मातीचा नाला बांध, नाला गाळ काढणे, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी बंधारा, शेततळे, बांधावरील वृक्षलागवड, शेततळे, वनतळे, समतल चर, शेताची बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण, गावतलाव दुरुस्ती, गाळ काढणे, ठिबक सिंचन, कालवा दुरुस्ती, पाझर तलाव, आदी स्वरूपाची कामे या प्रणालीद्वारे केली जात आहेत.

‘जिओ-टॅगिंग’ ची पुणे विभागातील स्थिती (२०१६-१७)जिल्हा       करावयाची कामे               झालेली कामे             टक्केपुणे                  ७२५५                          ६५१८                        ९०कोल्हापूर             ४७६                          ३४७                         ७३सातारा              २९९६                         २०९२                        ७०सांगली              ४७७३                         ३४०७                        ७१सोलापूर             २९७४४                      १२४६२                      ४२एकूण               ४५२४४                       २४८२६                       ५५ 

 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर