शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

केडीसीसी बँकेतच मिळणार पंधरा रुपयात कर्जासाठीचे ७/१२, ८अ उतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:15 IST

BankingSector Kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जासाठी लागणारे ७/१२, ८ अ, नमुना नं. ६ इत्यादी उतारे यापुढे केडीसीसी बँकेतच मिळणार आहेत. यामुळे सरकारी विलंब व चकरा मारण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार असून त्यांना तात्काळ कर्ज मिळणे सोपे झाले आहे.

ठळक मुद्देकेडीसीसी बँकेतच मिळणार पंधरा रुपयात कर्जासाठीचे ७/१२, ८अ उतारेसरकारी विलंब व चकरा मारण्यातून शेतकऱ्याची झाली सुटका     

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जासाठी लागणारे ७/१२, ८ अ, नमुना नं. ६ इत्यादी उतारे यापुढे केडीसीसी बँकेतच मिळणार आहेत. यामुळे सरकारी विलंब व चकरा मारण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार असून त्यांना तात्काळ कर्ज मिळणे सोपे झाले आहे.           बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय जाहीर केला. विकास सेवा संस्थांच्या कर्जदार सभासद शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यांचे वितरण करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला.            यावेळी अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा या बँकेचा केंद्रबिंदू आहे. बँकेकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते.  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा पाहून पीक -पाणी, इतर बोजे इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात. परंतु; सातबारा उतारे मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे अडचणीचे होते. त्यामुळे बँकेने सर्व शाखांमधून ही सुविधा सुरू केली आहे.           बैठकीत अमरापुर विकास सेवा संस्था -औरवाड ता. शिरोळचे सभासद शेतकरी झाकीरहुसेन साहेबहजरत पटेल, यशवंत विकास सेवा संस्था- हुनगिनहाळ -ता. गडहिंग्लजचे सभासद शेतकरी काशिनाथ कल्लाप्पा विभुते व बलभीम विकास सेवा संस्था - माले ता. पन्हाळाचे सभासद शेतकरी संभाजी मारुती पाटील यांना बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळाच्या हस्ते सातबारा उताऱ्यांचे वितरण झाले.     बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक -भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी सामंजस्य करार केला. शेतकऱ्यांना शाखा पातळीवर डिजिटल स्वाक्षरीत अधिकार अभिलेख, ७/१२ व ८ अ उतारे तसेच नमुना नंबर सहा इत्यादी उतारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रति उतारे पंधरा रुपये शासनाकडे जमा करावयाचे असून याकरीता मनुष्यबळ, नेटवर्किंग, संगणक व स्टेशनरीसाठी येणारा सर्व खर्च बँक स्वभांडवलातून उचलणार आहे.           यावेळी संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक व माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, आर. के.पोवार, सर्जेराव पाटील -पेरीडकर, अशोकराव चराटी, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, श्रीमती उदयानीदेवी साळुंखे आदी सदस्य तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने उपस्थित होते.              

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिक