शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

७० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित-- हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील ७० टक्के शेतकºयांना लाभच होणार नसल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या अन्यायाविरोधात आम्ही आज, शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटणार ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय बंद पाडणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील ७० टक्के शेतकºयांना लाभच होणार नसल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या अन्यायाविरोधात आम्ही आज, शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटणार आहोत. त्यांच्या सहकार्याने मुख्यमंत्र्यांचीही लवकरच भेट घेणार आहोत. सरकारने यात लक्ष घालून अन्याय दूर न केल्यास दसºयानंतर जिल्हाधिकारी कार्यालय बेमुदत बंद पाडण्याचा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.

कर्जमाफीचा लाभ देण्यापेक्षा तो कसा मिळणार नाही, अशीच व्यवस्था सरकारने विविध अटी घालून केली आहे. सेवा संस्थेच्या सचिवांची आम्ही बुधवारीच (दि. २०) बैठक घेतली. त्यांच्याकडूनही शेतकºयांना या योजनेचा लाभ होत नसल्याची प्रतिक्रिया आली. हंगामनिहाय कर्जवाटप, खावटी कर्जाचा व अपात्र कर्जमाफीचा समावेश नसल्याने बहुतांश शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ होणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.४०० कोटींना फटकाबँकेने १ जुलै २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत १ लाख ७५ हजार शेतकºयांना सुमारे ३५० कोटींचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. खावटी कर्जाचे १९१ कोटी वाटप झाले आहे आणि अपात्र कर्जमाफीतील ९२ कोटी रुपये कर्जाचे पुनर्गठन केले आहे. याचा अर्थ वाटप झालेले एकूण कर्ज ६३३ कोटींचे आहे. त्यातील ७० टक्के रक्कम मिळणार नाही, असे विचारात घेतले तरी हा शेतकºयांना किमान ४०० कोटींचा फटका बसू शकतो, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.चावडीवाचन म्हणजे अबू्र काढण्याचेच कामकर्जमाफीची सर्व माहिती शेतकरी आॅनलाईन भरून देत आहेत. त्याचा मोबाईल क्रमांकही तुमच्याकडे आहे. बँकेकडेही त्याचे तपशील आहेत. असे असताना पुन्हा कर्जमाफी कुणाला मिळाली याचे चावडीवाचन करणे म्हणजे शेतकºयाची अब्रू काढण्यातला प्रकार असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी केली. या चावडीवाचनाचा हेतूच कळत नसल्याचे त्यांनी सांगितले.मुदतवाढ द्याया योजनेसाठी पात्र असणाºया १८६१ संस्थांपैकी केवळ ४८० संस्था संगणकीकृत आहेत. उर्वरित संस्थांकडे संगणक सुविधा नसल्याने ही माहिती अन्य यंत्रणेकडून भरून घ्यावी लागत आहे.त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. ही मुदत आज, शुक्रवारपर्यंत होती.